Join us  

Pathaan च्या गाण्यातच नाही तर 'डायलॉग'मध्येही होणार बदल ?; 'मिसेज भारतमाता' उल्लेख काढून...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 11:49 AM

सीबीएफसीच्या निर्देशानुसार बेशरम रंग गाण्यातील दीपिकाचे काही क्लोज शॉट्स आहेत ते काढण्यात आले आहेत. मात्र भगव्या बिकीनीवरुन काय निर्णय झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Pathaan Movie : शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' सिनेमाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. सिनेमाचे नाव असेल किंवा बेशरम रंग हे गाणं असेल पठाण हा काही ना काही कारणाने विवादातच अडकला. खरं तर या वादाचा सिनेमाला फायदाही झाला मात्र अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत पठाण बॉयकॉट करण्याची मागणी केली. शेवटी सीबीएफसीचे (CBFC) अध्यक्ष प्रसून जोशी  अध्यक्ष प्रसून जोशी (Prasoon Joshi) यांनी देखील  निर्मात्यांना सुधारित आवृत्ती बोर्डाकडे पाठवण्यापूर्वी चित्रपटात आणि गाण्यांमध्ये सूचवण्यात आलेले बदल करण्यास सांगितलं आहे. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार आता पठाण मध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले हे समोर आले आहे.

पठाणमधील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणे चांगलेच वादग्रस्त ठरले. या गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे वादाला तोंड फुटले. आता सिनेमाच्या फायनल कट मध्ये गाण्यात नेमके काय बदल झाले हे समोर आले आहे. बॉलिवुड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बेशरम रंग गाण्यातील दीपिकाचे काही क्लोज शॉट्स आहेत ते काढण्यात आले आहेत. तसेच बहुत तंग किया या वाक्यावर दीपिकाच्या मादक अदांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्याजागी दुसरे शॉट्स लावले आहेत. दीपिकाचे काही साईड पोज सुद्धा काढण्यात आले आहेत. मात्र भगव्या बिकीनीवरुन काय निर्णय झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

फक्त गाण्यातच नाही तर डायलॉगही बदलले

रिपोर्टनुसार, 'पठाण चित्रपटात १३ ठिकाणी PMO पंतप्रधान कार्यालयाचा उल्लेख आहे. तो काढून प्रेसिडेंट किंवा मंत्री असा उल्लेख करायला सांगितला आहे. तसेच RAW रॉ या गुप्तचर संस्थेचा उल्लेख काढून हमारे असा केला आहे. अशोकचक्रच्या ऐवजी वीर पुरस्कार, एक्स केजीबी च्या जागी एक्स एसबीयू आणि 'मिसेज भारतमाता'च्या ऐवजी 'हमारी भारतमाता' असा उल्लेख करायला सांगितला आहे. 

Pathan movie controversy: 'बिकिनी वादा'नंतर पठाण चित्रपटात होणार बदल?; सेन्सॉर बोर्डाला हवाय 'बॅलन्स'

अशीही माहिती मिळत आहे की, सिनेमात ब्लॅक प्रिजन,रशिया हा उल्लेख काढून केवळ ब्लॅक प्रिजन असा ठेवण्यात आला आहे. यासोबतच पठाण ला U/A रेटिंग देण्यात आली आहे. चित्रपटाची वेळ १४५ मिनिटे म्हणजेच २ तास २६ मिनिटे एवढी असेल. 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. शाहरुख खान ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे तसेच दीपिकाचा बोल्ड लुक आणइ जॉन अब्राहमचीही भूमिका दमदार असणार आहे. १० जानेवारी रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला जाणार आहे.

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानप्रसून जोशीदीपिका पादुकोणसिनेमा