शाहिद-मीराची ‘रंगून’ टीमसोबत पार्टी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 18:53 IST
अलीकडेच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. यूट्यूबवर क्षणार्धातच शेकडो लाईक्स मिळाले. चित्रपटाच्या टीमला हे कळाल्यानंतर ...
शाहिद-मीराची ‘रंगून’ टीमसोबत पार्टी!
अलीकडेच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. यूट्यूबवर क्षणार्धातच शेकडो लाईक्स मिळाले. चित्रपटाच्या टीमला हे कळाल्यानंतर ’सेलिब्रेशन तो बनता हैं’ म्हणत सर्वांनी जंगी पार्टी केली. या पार्टीत शाहिद कपूर हा पत्नी मीरा राजपूतसह आला होता. विशाल भारद्वाज, शाहिद कपूर, मीरा राजपूत, रेखा भारद्वाज, साजिद नादियाडवाला, वर्दा नादियाडवाला, मधू मँटेना व सेटवरील इतर कलाकारही उपस्थित होते. पण, तुम्हाला ठाऊक आहे का, यात सैफ अली खान आणि करिना कपूर हे आले नव्हते. साजिदने त्यांच्या पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्याला ‘सैफ अली खान, कंगना राणौत आम्ही तुम्हाला मिस करतो आहोत. आम्ही फुल्ल टू धम्माल करतोय. रंगून टीम.’ अशी कॅप्शन दिलीय.रोमान्स आणि अॅक्शन असा सगळा मसाला असलेल्या या ट्रेलरमध्ये कंगना, शाहीद व सैफ या तिघांचाही दमदार अभिनय पाहायला मिळतोय. चित्रपटाची कथा १९४० व्या दशकातील (दुसरे महायुद्ध) आहे. यात ‘वॉर’ आहे. तसेच ‘रोमान्स’ही आहे. शाहीद यात एका लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. कंगनाने यात अॅक्शन दिवा मिस ज्युलियाची भूमिका साकारली आहे. मिस ज्युलिया ४० च्या दशकातील स्टंटवूमन आहे. तर सैफ एका राजकुमाराच्या भूमिकेत आहे.