Join us

​परिणीती चोप्राचे गाणे ऐकून चक्क झोपी गेली ‘गोलमाल4’ टीम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2017 15:33 IST

परिणीती चोप्रा हिच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटातील ‘माना की हम यार नहीं’ हे गाणे रिलीज झाले. हे गाणे अनेकांना आवडले. पण ‘गोलमाल4’ची टीम मात्र हे गाणे ऐकून चक्क झोपी गेली.

परिणीती चोप्रा हिच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटातील ‘माना की हम यार नहीं’ हे गाणे रिलीज झाले. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, हे गाणे खुद्द परिणीतीने गायले आहे. या गाण्याबद्दल परिणीती कमालीची उत्सूक होती. तिची एक्साईटमेंट जराही लपून राहिली नव्हती.  कालपासून सोशल मीडियावर स्वत:ची एक्साईटमेंट शेअर करण्याचा तिने जणू सपाटा लावला होता. आज हे गाणे रिलीज झाले. हे गाणे अनेकांना आवडले. पण ‘गोलमाल4’ची टीम मात्र हे गाणे ऐकून चक्क झोपी गेली. होय, ‘गोलमाल4’मध्ये परिणीती आहे, हे तुम्ही जाणताच. पण या टीमला परिणीतीने ‘मेरी प्यारी बिंदू’मधील गाणे ऐकवून चांगलाच वैताग आणला. मग काय ‘गोलमाल4’ टीमवर झोपण्याचीच वेळ आली. अजय देवगणने एक फोटो पोस्ट करून याबद्दल माहिती दिली आहे. या फोटोत अजय देवगण, रोहित शेट्टी, अर्शद वारशी, तुषार कपूर, जॉनी लिव्हर सगळेच झोपी गेलेले दिसताहेत. अजयने हा फोटो शेअर करताना लिहिलेय की, परिणीतीने तिचे गाणे आम्हा सगळ्यांना दहापेक्षा अधिकवेळा ऐकवले. ते गाणे आम्हाला आवडलेही. पण आता आम्हाला झोप येत आहे. येत्या मे महिन्यात ‘मेरी प्यारी बिंदू’ रिलीज होतो आहे. या चित्रपटाकडून परिणीतीला बºयाच अपेक्षा आहेत. चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी परिणीती बरीच मेहनत घेताना दिसते आहे. यात ती एका गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने गायनाचे रितसर प्रशिक्षण घेतले, प्रॅक्टिस केली आणि गाणे गायिले देखील. एकाच प्रयत्नात ‘माना की हम यार नहीं’ हे गाणे तिने  रेकॉर्ड केले.