बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे पती राघव चड्ढा यांनी राज्यसभेत पितृत्व रजेचा (Paternity Leave) महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. मुलाच्या जन्मानंतर वडिलांना मिळणारी 'पितृत्व रजा' (Paternity Leave) ही केवळ सवलत नसून तो एक 'कायदेशीर अधिकार' असावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावर परिणीती चोप्राने आपल्या पतीचे मनापासून कौतुक केले आहे.
परिणीती चोप्राने एक अत्यंत भावुक पोस्ट लिहिली. "आज तुला संसदेत केवळ एक खासदार म्हणून नाही, तर आपल्या बाळाचा 'बाबा' म्हणून बोलताना पाहणे माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण ठरलाय. मुलाच्या जन्मानंतर केवळ आईचाच नवा जन्म होत नाही, तर एका वडिलांचाही जन्म होतो, हे तू तुझ्या कामातून दाखवून दिले आहेस. तू ज्या प्रकारे घरच्या जबाबदाऱ्या उचलतोस, त्याचा मला सार्थ अभिमान आहे"
ती पुढे म्हणाली, "आज तू संसदेत त्या सर्व आईंचा आवाज बनला आहेस, ज्या मुलांचे संगोपन एकट्याने करतात आणि ज्यांचे दुःख कुणी ऐकत नाही. तुझ्या या मागणीमुळे जर पालकांना, विशेषतः मातांना थोडा जरी आधार मिळाला, तर ती खूप मोठी गोष्ट असेल".
राघव चड्ढा संसदेत काय म्हणाले?
राघव चड्ढा यांनी संसदेत पितृत्व रजेला (Paternity Leave) कायदेशीर हक्क देण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यांनी मुलाच्या संगोपनात पित्याचा समान सहभाग असावा, असे सांगत बाळाच्या जन्मानंतर केवळ आईवर जबाबदारी न टाकता वडिलांनाही रजा मिळायला हवी, यावर भर दिला. चड्ढा यांनी मागणी केली की, पितृत्व रजा ही केवळ सवलत नसून तो एक कायदेशीर अधिकार असावा. सध्या केवळ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची सशुल्क पितृत्व रजा मिळते, तर खाजगी क्षेत्रात हे धोरण वेगवेगळे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये उदयपूर येथील 'द लीला पॅलेस'मध्ये विवाह केला होता. यानंतर ते १९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुलाचे आई-बाबा झाले. 'नीर' असं त्यांच्या मुलाचं नाव आहे.
Web Summary : Raghav Chadha advocates for paternity leave as a legal right in parliament. His wife, Parineeti Chopra, penned an emotional post supporting his stance, highlighting shared parental responsibility. She expressed pride in Raghav for voicing the concerns of mothers and advocating for parental support.
Web Summary : राघव चड्ढा ने संसद में पितृत्व अवकाश को कानूनी अधिकार के रूप में समर्थन किया। उनकी पत्नी, परिणीति चोपड़ा ने उनके रुख का समर्थन करते हुए एक भावनात्मक पोस्ट लिखी, जिसमें माता-पिता की साझा जिम्मेदारी पर प्रकाश डाला गया। उन्होंने माताओं की चिंताओं को आवाज देने और माता-पिता के समर्थन की वकालत करने के लिए राघव पर गर्व व्यक्त किया।