दरम्यान चारू यांच्या अतिशय जवळ असलेल्या एका स्पॉटबॉयने चारू यांचा मृत्यूमागे वाढता तणाव हे कारण असल्याचे म्हटले आहे. चारू अलीकडे पहाटे ३ वाजेपर्यंत शूटींग करत होत्या, असे या स्पॉटबॉयने सांगितले. आज दुपारी चारू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चारू सब टीव्हीवरील ‘त्रि देवियां’ या मालिकेत काम करत होत्या. ‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘प्रतिज्ञा’ आणि ‘उतरण’ या मालिकेतील त्यांची भूमिकाही लोकप्रीय ठरली होती.
‘इशकजादे’ या चित्रपटात चारू यांनी परिणीती चोप्रा हिच्या ‘फेवरेट माँ’ची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनावर परिणीतीने दु:ख व्यक्त केले आहे. ‘इशकजादे’मधील तुम्ही सगळ्यांत प्रेमळ आई होतात. तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शानदार होता. तुम्हाला विसरणे शक्य नाही. ईश्वर तुमच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो, अशा भावना परिणीतीने व्यक्त केल्या आहेत.