या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकणार परिणीती चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:48 IST
गेल्या वर्षी सलमान खान आणि करण जोहर यांने एकत्र येऊन एक चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटा मुख्य भूमिकेत ...
या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकणार परिणीती चोप्रा
गेल्या वर्षी सलमान खान आणि करण जोहर यांने एकत्र येऊन एक चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटा मुख्य भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे. मात्र काही मतभेद झाल्यानंतर सलमानने या चित्रपटातून माघार घेतली. त्यानंतर हा चित्रपट बनले कि नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र अक्षय आणि करण जोहरने या चित्रपटाचे नाव बदलून सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 2019 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऐवढेच नाही तर या चित्रपटासाठी कॅटरिना कैफ आणि परिणीती चोप्राचे नाव समोर येते आहे. बॉलिवूड लाईच्या रिपोर्टनुसार या त कॅटरिना कैफ नाही तर परिणीती चोप्रा होण्याचे चान्सेस जास्त आहेत. परिणीती आणि अक्षय कुमारची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याच कथेला घेऊन अजय देवगणसुद्धा चित्रपट तयार करतो आहे. ज्यावेळी अजय देवगणने सलमान खानला या गोष्टीबाबत सांगितले होते की त्याच्या आगामी चित्रपटाशी केसरी कथा मिळती-जुळती आहे त्यावेळी सलमानने या चित्रपटातून माघार घेतली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करतो आहे. 'बॅटल ऑफ सारागढी' वर या चित्रपटाची कथा आधारित आहे. सारागढीची लढाई भारतातील सर्वात मोठी लढाई मानली जाते ज्यात 21 शीख सैनिकांनी सारागढी किल्ला पाठणापासून वाचवण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पाठणाबरोबर लढाई लढले होते. इंग्लंडने देखील त्यांच्या पराक्रमाचा सन्मान केला होता. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये हा चित्रपट फ्लोअरवर येणार आहे. सध्या अक्षय कुमार त्याचा चित्रपट 2.0 आणि पॅडमनमध्ये व्यस्त आहे. 2.0 हा चित्रपट बॉलिवूडमधला सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे बजेट एकूण 400 कोटींचे असून यात अक्षयकुमार बॅड बॉय ची तर राजनीकांत हिरोच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा हा चित्रपट एकाच वेळी 7000 हजार स्क्रीनवर रिलीज करण्यात येणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यांत रिलीज होणार आहे.