परिणीती चोप्राने ‘तो’ व्हिडीओ केला डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 21:50 IST
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चांगलेच अडचणीत आणले होते. तिच्या अनेक फोलोअर्सनी तिला ...
परिणीती चोप्राने ‘तो’ व्हिडीओ केला डिलीट
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चांगलेच अडचणीत आणले होते. तिच्या अनेक फोलोअर्सनी तिला या व्हिडीओसाठी चांगलेच सुनावले. यानंतर परिणीती चोप्राने आपला वादात अडकेलेला फोटो सोशल मीडियाहून डिलीट केला आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी दुबईमध्ये आहे. मंगळवारी परिणीतीने एक व्हिडीओ अपलोड केला होता. या पोस्टमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मुंबईच्या एका बिचवर चालताना दिसत होती. या व्हिडीओत एवढेच नव्हते तर तिच्या सोबत असलेला एक व्यक्ती तिला सावली देण्यासाठी हातात छत्री धरून होता, शिवाय त्याच्या हातात तीन बॅग देखील होत्या. फोटोवर परिणीती चोप्राने एक कॅप्शनही दिले होते. या कॅप्शनमुळे तिला चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागला. या व्हिडीओवर चाहत्यांच्या शेकडो कमेंटधस आल्या. यात जास्तीत जास्त चाहत्यांनी तिला हा प्रश्न विचारला की अखेर तूला उन्हापासून स्वत:चे रक्षण करायचे आहे तर तू छत्री का पक डली नाहीस. काही फॅन्सनी तिला तू असा व्हिडीओ शेअर करून शो आॅफ करीत आहेस, तू जर स्वत: छत्री पकडली तर तुझ्या स्टारडममध्ये कमतरता येणार नाही असाही उल्लेख केला. विशेष म्हणजे या व्हिडीओनंतर परिणीती चोप्राने आपला एक फोटो शेअर करीत उन्हाचा आनंद घेताना असे कॅ प्शन दिले. या पोस्टनंतर चाहत्यांचा पारा आणखीच चढला, अनेकांना तिला हा प्रश्न विचारला की, एकीकडे तू उन्हाचा आनंद घेत आहेस तर दुसरीकडे तू उन्हापासून बचाव व्हावा यासाठी एका बिचाºया मानसाला आपल्यासोबत छत्री घेऊन सोबत चालवित आहे. या दोन्ही पोस्ट बिहार्इंड सिन सारख्या आहेत का आम्हाला सांग. परिणीती चोप्राच्या पोस्टवर कमेंट वाढत असल्याचे पाहून तिने हा व्हिडीओ डिलीट केला. चाहत्यांच्या रागाला समोर जाण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वी देखील तिला असाच सामना करावा लागला होता.