परेश रावलने म्हटले, सुनील दत्तची भूमिका साकारणे सुखद अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 10:20 IST
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता परेश रावल यांनी आगामी ‘दत्त’ या चित्रपटात संजय दत्त याचे वडील दिवंगत अभिनेता सुनील दत्त यांची ...
परेश रावलने म्हटले, सुनील दत्तची भूमिका साकारणे सुखद अनुभव!
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता परेश रावल यांनी आगामी ‘दत्त’ या चित्रपटात संजय दत्त याचे वडील दिवंगत अभिनेता सुनील दत्त यांची भूमिका साकारली आहे. या भूमिकेचा अनुभव शेअर करताना परेश रावल यांनी म्हटले की, ‘माझ्यासाठी ही भूमिका साकारणे खूपच सुखद अनुभव होता. राजकुमार हिरानी, रणबीर कपूर आणि लेखक अभिजीत जोशी यांच्यामुळेच मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मला असे वाटते की, सुनील दत्त खूपच विनम्र होते. त्यांच्या डोक्यात स्टारडमची कधीच हवा गेली नाही. त्यामुळेच असे व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारणे खूपच सुखद आणि दिलासादायक होते. पुढे बोलताना परेश रावल यांनी सांगितले की, चित्रपटाची कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. चित्रपटात संजूबाबाची भूमिका साकारणाºया रणबीरसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता. तो एक प्रतिभावंत अभिनेता आहे. जेव्हा परेश यांना तिन्ही खान आणि युवा कलाकार यांच्यातील तुलना कशी होऊ शकते? या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, ‘अशाप्रकारची तुलना करणे चुकीचे ठरेल. कारण इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कलाकार त्याच्यातील गुणवैशिष्ट्यांमुळेच येत असतो. त्यामुळे अशाप्रकारच्या तुलना या तथ्यहीन असतात. परेश यांनी म्हटले की, सलमान खान आणि शाहरूख खान यांचे विशेष असे आकर्षण आणि करिष्मा आहे. तर आमिर खान यांच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. कारण तो पूर्ण पॅकेज आहे. तो कुठल्याच गोष्टीवर अवलंबून नाही. त्याने टाटा-बिर्लापेक्षा अधिक प्रसिद्धी मिळविली आहे. त्यामुळेच त्याचा चित्रपट उत्कृष्ट असेल हा विचार करूनच प्रेक्षक चित्रपटगृहात जातात. तर युवा ब्रिगेडविषयी सांगायचे झाल्यास वरुण धवन आणि रणबीर कपूर यांच्यात प्रचंड क्षमता आहे. दोघेही स्वत: सिद्ध करण्याची धडपड करीत आहेत.