परेश रावल कार्तिक आर्यनला का छळताहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 14:14 IST
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाचा अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा परतला आहे. होय, अश्विनी धीर दिग्दर्शित ‘अतिथी इन लंडन’ ...
परेश रावल कार्तिक आर्यनला का छळताहेत?
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाचा अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा परतला आहे. होय, अश्विनी धीर दिग्दर्शित ‘अतिथी इन लंडन’ हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होतोय. यात कार्तिक आर्यन आणि ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांची ‘कॉमिक जुगलबंदी’ रंगणार आहे.कार्तिकने स्वत: ‘अतिथी इन लंडन’ची रिलीज डेट आपल्या सोशल अकाऊंटवरून जाहिर केली. यासोबतच एक फोटोही पोस्ट केला. यात कार्तिक परेश रावल यांच्यासोबत दिसतो आहे. या फोटोसोबत कार्तिकने लिहिलेले कॅप्शनही मोठे मजेशीर आहे. ‘‘ हे (परेश रावल) मला किती छळताहेत, याचा हा फक्त ट्रेलर आहे. ‘अतिथी इन लंडन’ पुढीलवर्षी मे महिन्यात येणार आहे,’’ असे कॅप्शन कार्तिकने या फोटोला दिले आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत परेश रावल तसेच कृती खरबंदा आणि तन्वी आजमी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट एका आगळ्या वेगळ्या प्रेमकथेवर आधारित आहे.सध्या लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटाच्या पुढच्या टप्प्याचे शूटींग न्यूयॉर्कमध्ये लवकरच सुरु होणार आहे. ‘अतिथी इन लंडन’ हा अजय देवगण, परेश रावल आणि कोंकणा सेन शर्मा स्टारर ‘अतिथी तुम कब जाओगे?’ चा सीक्वल आहे. या चित्रपटात परेश रावल पुन्हा एकदा वैताग आणणाºया एका आंगतुक पाहुण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अर्थात यावेळी त्यांना अजय वा कोंकणा नाही तर आर्यन व कृति या दोघांना झेलावे लागणार आहे. चित्रपटात कार्तिक हा त्याची आॅनस्क्रीन गर्लफ्रेंड अर्थात कृती खरबांदा हिच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत असतो. तेव्हा परेश रावल आणि त्याची पत्नी (तन्वी आझमी) अचानक त्यांच्या घरी पाहुणे म्हणून येतात. यानंतर काय धम्माल घडते, ते पाहायला आपल्याला मे महिन्याचीच प्रतीक्षा करावी लागणार.