Join us
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच वाचायला मिळणार आशा पारेख यांची बायोग्राफी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2017 13:29 IST

अलीकडे अभिनेते ऋषी कपूर, दिग्दर्शक करण जोहर आदींच्या बायोग्राफी आल्यात. आता एकेकाळची गाजलेली अभिनेत्री आशा पारेख यांची बायोग्राफी आपल्याला ...

अलीकडे अभिनेते ऋषी कपूर, दिग्दर्शक करण जोहर आदींच्या बायोग्राफी आल्यात. आता एकेकाळची गाजलेली अभिनेत्री आशा पारेख यांची बायोग्राफी आपल्याला वाचायला मिळणार आहे. ‘दी हिट गर्ल’ असे आशा पारेख यांच्या बायोग्राफीचे नाव आहे. २६० पानांच्या या बायोग्राफीत आशा यांच्या आयुष्यातील अनेक ‘खास’ गोष्टी आपल्याला कळणार आहेत. विशेष म्हणजे या बायोग्राफीचे प्रकाशनही असेच ‘खास’ असणार आहे. बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान याच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. सलमान मुंबईत आयोजित सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन करेल. यानंतर दिल्लीतही या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होईल.आशा पारेख यांनी लेखक खालिद मोहम्मद यांच्यासोबत मिळून ही बायोग्राफी लिहिली आहे. याबद्दल त्यांनी सांगितले, ही बायोग्राफी माझ्या आयुष्यावर आहे. अभिनयच नाही तर खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर मी यात प्रकाश टाकला आहे. दिलीप कुमार यांच्यासोबत माझा एकही चित्रपट नाही. खरे तर मला त्यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. पण माझी ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.  मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. पण हा चित्रपट बंद झाला. माझ्या बायोग्राफत मी मालिका, टेलिव्हिजन आणि सेन्सॉर बोर्डबद्दलही लिहिले आहे.६० व ७० च्या दशकात  आशा पारेख आघाडीच्या अभिनेत्री होत्या. देवआनंद, राजेश खन्ना, शशी कपूर, जीतेन्द्र, मनोज कुमार आणि धर्मेन्द्र यासारख्या सुपरस्टार्ससोबत काम केले. दिलीप कुमारसोबत त्यांची जोडी कधीच दिसली नाही. मला दिलीप कुमार आवडत नव्हते, म्हणून मी त्यांच्यासोबत काम केले नाही, असे आशा पारेख यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.