सकाळी जेव्हा शाहरुख परिवारासमवेत अलिबागला निघाला होता तेव्हा अबरामचे काही फोटो समोर आले होते. त्यानंतर अलिबागहून मुंबईला हेलिकॉप्टरने परतानाचे काही फोटो समोर आले. मात्र फोटोमध्ये अबराम अलिबागहून मुंबईत परतण्यास फारसा उत्सुक दिसला नाही. त्यामुळे शाहरुखने त्याला बळजबरीने उचलून हेलिकॉप्टरने बसविले. त्यानंतर शाहरुख आणि अबराम हे दोघे मुंबईतील त्याच्या मन्नत बंगल्यात चाहत्यांचे अभिवादन स्वीकारताना दिसले. शाहरुख अबरामला घेऊन छतावर आला होता. शाहरूख चाहत्यांचे अभिवादन स्वीकारण्यात दंग असताना अबरामचा चेहरा बघण्यासारखा होता. त्याच्या चेहºयावरील थकवा स्पष्टपणे दिसत होता.
शाहरुखने सोशल मीडियावर अबरामसोबतचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो खूपच वैतागलेला दिसत आहे. आता तो दिवसभराच्या थकव्यामुळे वैतागला की शाहरुखच्या कुठल्या तरी गोष्टीवरून तो त्याच्यावर नाराज झाला हे सांगणे मात्र मुश्कील आहे. असो, किंग खानवर आज दिवसभर जगभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.