Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी अनन्याला फराह खानने दिलेल्या ‘डीएनए’ सल्ल्यावर पप्पा चंकी पांडेने दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 16:46 IST

फराहने लिहिले होते की, ‘कृपया एक डीएनए टेस्ट करून घे, कारण चंकी पांडेची मुलगी असूनही तू खूपच सुंदर आहेस.’ फराहचा हा सल्ला त्यावेळी खूपच चर्चेत आला. आता फराहच्या सल्ल्याला चंकी पांडे याने उत्तर दिले आहे.

बी-टाउनमध्ये जेव्हा-जेव्हा स्टार किड्सच्या नावांचा उल्लेख केला जातो तेव्हा अनन्या पांडे हे नावदेखील आवर्जून घेतले जाते. होय, अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडेची मुलगी असलेली अनन्या तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे खूपच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक तथा कोरिओग्राफर फराह खान हिने अनन्या पांडे हिला एक सल्ला दिला होता. भावना पांडे हिने इन्स्टावर शेअर केलेल्या अनन्याच्या एका फोटोला कॉमेण्ट देताना फराहने लिहिले होते की, ‘कृपया एक डीएनए टेस्ट करून घे, कारण चंकी पांडेची मुलगी असूनही तू खूपच सुंदर आहेस.’ फराहचा हा सल्ला त्यावेळी खूपच चर्चेत आला. आता फराहच्या सल्ल्याला चंकी पांडे याने उत्तर दिले आहे. हिंदुस्तान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार चंकी पांडेने म्हटले की, ‘फराह माझी खूपच चांगली मैत्रिण आहे. मला माहीत आहे की, तिच्या या सल्ल्याचा काय अर्थ आहे. फराहने अनन्याला सुंदर म्हटले आहे. त्यामुळे मी याकडे कॉम्प्लिमेन्ट म्हणून बघतो. फराह, साजिद आणि माझा सेंस आॅफ हुमर खूप आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच एकमेकांवर अशाप्रकारचे जोक्स करीत असतो.’ अनन्याची आई भावनाने काही दिवसांपूर्वी अनन्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. जेव्हा हा फोटो फराह खान हिने बघितला तेव्हा तिने सर्वांत अगोदर या फोटोला कॉमेण्ट दिली. त्यानंतर अनन्याचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला. कारण फराहच्या या कॉमेण्टवर नंतर चांगलीच चर्चा रंगली. फराहने अनन्याला तू चंकी पांडेची मुलगी असूनही सुंदर आहेस, त्यामुळे डीएनए टेस्ट करून घे, असा सल्ला दिला होता. यावेळी फराहने या कॉमेण्टमध्ये स्माइलच्या इमोजीचाही वापर केला होता. त्यामुळे फराह चंकीची चेष्टा करीत असावी असेच काहीसे दिसत होते. मिरर टुडेला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा याच संदर्भात चंकी पांडेला विचारण्यात आले तेव्हा त्याने मी याकडे चेष्टामस्करीत बघत असल्याचे म्हटले. त्याचबरोबर मुलगी अनन्याला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी मला फारसा त्रास होणार नाही, असेही स्पष्ट केले. अनन्याला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे. ती नेहमीच तिचे सुंदर फोटोज् इन्स्टाग्रामवर अपलोड करीत असते. या फोटोमुळेच ती बी-टाउनमध्ये चर्चेत असते.