Join us  

अक्षय कुमार आणि क्रितीच्या 'बच्चन पांडे'मध्ये झाली आता पंकज त्रिपाठीची एंट्री !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 6:15 PM

 अक्षय कुमारचा आगामी 'बच्चन पांडे' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

 अक्षय कुमारचा आगामी 'बच्चन पांडे' हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमात अक्षय कुमारच्या बरोबर क्रिती सनॉन आहे. फरहद सामजी दिग्दर्शित या सिनेमात अर्शद वारसी आणि जॅकलीन फर्नांडिसलादेखील कास्ट करण्यात आले आहे. आता अशी माहिती मिळतेय की पंकज त्रिपाठीची सुद्धा या सिनेमात वर्णी लागली आहे. 

 पंकज त्रिपाठी आणि क्रिती सनॉन यांनी 'बरेली की बर्फी' आणि 'लुका छुप्पी' सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. पण अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील.  दोन्ही अभिनेते त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात , म्हणून त्यांना 'बच्चन पांडे' मध्ये एकत्र पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार पंकज त्रिपाठी जानेवारीत जैसलमेरमध्ये या सिनेमाच्या टीमला जॉईन करणार आहे.

 असं सांगितलं जात आहे की, या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे.  अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. आधी हा सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज होणार होता, मात्र कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग बर्‍याच दिवसांसाठी थांबले. अजूनपर्यंत,  निर्मात्यांनी पुढील रिलीज डेट  जाहीर केलेली नाही. 

टॅग्स :अक्षय कुमारपंकज त्रिपाठी