Join us
Daily Top 2Weekly Top 5

पंकज कपूरला वाटतो शाहिदचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:08 IST

बॉ लीवूड कलाकारांच्या मुलांनी याच इंडस्ट्रीमध्ये जर करिअर करायला सुरूवात केली, तर सामान्य लोकांचा असाच समज होतो की, या ...

बॉ लीवूड कलाकारांच्या मुलांनी याच इंडस्ट्रीमध्ये जर करिअर करायला सुरूवात केली, तर सामान्य लोकांचा असाच समज होतो की, या मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्टारडमचा नक्कीच उपयोग झाला असणार आणि तुलनेने त्यांचे बॉलीवुडमध्ये टिकुन राहणे सोपे झाले असणार. पण शाहिद कपूरच्या बाबतीत हे खरे नाही. त्याचे वडील पंकज कपूर म्हणाले, 'शाहिदने आज जे काही मिळवले आहे, ते सगळे स्वत:च्या बळावर. त्याला माझी कुठलीही मदत मिळाली नाही. त्याला मिळालेल्या यशाचा मला गर्व वाटतो.' ३४ वर्षीय शाहिदने 'इश्क विश्क' पासून करिअरला सुरूवात केली. या चित्रपटासाठी त्याचे खूप कौतुकही झाले. त्यानंतर 'जब वी मेट', 'कमीने', 'हैदर' यांसारखे एकापेक्षा एक दमदार चित्रपट त्याने केले. २२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार्‍या 'शानदार' मध्ये तो पहिल्यांदाच वडील पंकज कपूर सोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. या चित्रपटाद्वारेच त्याची बहिण सना कपूरही बॉलीवुडमध्ये पदार्पन करेल.