Join us

कंगणा राणौत म्हणते कबड्डी... कबड्डी... कबड्डी..., नवीन फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 16:44 IST

कबड्डीपटूच्या भूमिकेसाठी तिला वजनही वाढवायचे होते. त्यानुसार तिने १० किलो वजनही वाढवले आहे.

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. कंगणाच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची रसिकांमध्ये उत्सुकता असते. 'मणिकर्णिका - द- क्वीन ऑफ झाँसी' सिनेमानंतर आता कंगणा आणखी एका वेगळ्याच भूमिकेतून रसिकांच्या भेटीला येणार आहे. कबड्डीपटूच्या भूमिकेत कंगणा झळकणार आहे. कंगणाचा एक फोटो समोर आला आहे. यांत ती कबड्डीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 'पंगा' असे या सिनेमाचे नाव आहे. अश्विनी अय्यर तिवारी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

खरंतर 'पंगा' सिनेमात कबड्डीचे खूप सीन आहेत. त्यामुळे निर्मात्यांना कंगना सिनेमातील इतर कलाकार स्क्रीनवर कबड्डी खेळताना नॅचरल वाटेल. त्यामुळे जवळपास दीड महिन्यांपर्यंत या कलाकारांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कलाकारांना राष्ट्रीय पातळीवरील गौरी वाडेकर, विश्वास मोरे व तारक रोल प्रशिक्षण देणार आहे. कंगना राणौतदेखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय करते आहे. यापूर्वी ती कधीच कबड्डी खेळलेली नाही आणि तिच्यासाठी हा खेळ नवादेखील नाही. त्यामुळे तिला या खेळातील बारकावे समजायला कोणताच त्रास होत नाही.

कबड्डीपटूच्या भूमिकेसाठी तिला वजनही वाढवायचे  होते. त्यानुसार तिने १० किलो वजनही वाढवले आहे. सध्या कंगना हाय कॅलॅरी प्रोटीन डाएटवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे.