Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानच्या सायबर आर्मीने केले अभिषेक बच्चनचे ट्विटर अकाउंट हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 15:28 IST

अभिनेता अभिषेक बच्चन याचे ट्विटर अकाउंट बुधवारी पाकिस्तान समर्थक तुर्कीच्या सायबर आर्मी अयिल्दिज टिमने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर ...

अभिनेता अभिषेक बच्चन याचे ट्विटर अकाउंट बुधवारी पाकिस्तान समर्थक तुर्कीच्या सायबर आर्मी अयिल्दिज टिमने हॅक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अगोदर दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचेही ट्विटर अकाउंट हॅक केल्याचे उघड झाले होते. अभिषेकचे अकाउंट हॅक  होताच, त्याच्या अकाउंटला असलेला निळ्या रंगाचा मार्क काढण्यात आला, तसेच कव्हर फोटोवर एक मिसाइल बनविण्यात आले. ज्यावर सांकेतिक शब्दांमध्ये ‘अयिल्दिज टिम असे लिहिले आहे. ट्विटरने त्यांच्या एका अधिकृत पोस्टमध्ये म्हटले की, आमची टीम काही भारतीय अकाउंटधारकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ज्यांचे अकाउंट हॅक झाले आहेत, अशा अकाउंटधारकांना आम्ही याबाबतची माहिती देत आहोत. त्याचबरोबर भडकाविणारे किंवा चेतावणी संदेश असलेल्या खात्यावर जाणे शक्यतो टाळावे, असेही आम्ही आवाहन करीत आहोत. गेल्या मंगळवारी अभिनेते अनुपम खेर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि भाजपाचा महासचिव राम माधव तथा वरिष्ठ पत्रकार आणि खासदार स्वपन दासगुप्ता यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याची बातमी समोर आली होती. अनुपम खेर यांचे अकाउंट पूर्ववत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या फॉलोअर्सला अज्ञात लिंक ओपन करू नका अशाप्रकारचे आवाहन केले.