Join us

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या घरी चिमुकलीचं आगमन, लेकीचं नाव आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 16:21 IST

रमजानच्या मुहुर्तावर आतिफ अस्लमच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या (Atif Aslam) घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. रमजानच्या मुहुर्तावर आतिफ अस्लमच्या पत्नीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याच आनंदात आतिफने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंद साजरा केला आहे. 

आतिफने इन्स्टाग्रामवर बाळाचा फोटो पोस्ट केला आहे. बाळाचा चेहरा लपवत त्यावर 'ब्युटी स्लीप'असं त्याने लिहिलं आहे. तसंच कॅप्शनमध्ये तो म्हणतो, 'अखेर प्रतिक्षा संपली. माझ्या हृदयाची राणी आली आहे. देवाच्या कृपेने सारा आणि बाळ दोघीही सुखरुप आहेत. असंच तुमच्या प्रार्थनांमध्ये राहू द्या. हलिमा आतिफ अस्लमकडून रमजानच्या शुभेच्छा!'

आतिफने कॅप्शनमधून मुलीचं नावही सांगितलं आहे. 'हलिमा' असं चिमुकलीचं नाव ठेवण्यात आलंय. हे अरेबिक नाव असून याचा अर्थ होतो 'कोमल'. 2013 मध्ये आतिफने सारासह निकाह केला. त्यांना याआधीच दोन मुलं आहेत. अर्यान आणि अब्दुल अहाद अशी त्यांची नावं आहेत. आता त्यांच्या कुटुंबात या गोंडस चिमुकलीचंही आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वच चाहते आणि कलाकार आतिफवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 

आतिफ लोकप्रिय गायक आणि संगीत दिग्दर्शक आहे. त्याने भारतीय सिनेमातही अनेक गाणी गायली आहेत. 'तू जाने ना', 'तेरे संग यारा','मै रंग शरबतो का' यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी भारतीयांच्या मनात घर करुन आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीपरिवारपाकिस्तान