Join us

​ पाकिस्तानी अभिनेत्री मीराचा ‘हा’ व्हिडिओ झालाय ‘फेल’! वाचा संपूर्ण बातमी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 15:51 IST

सन २००५ मध्ये अश्मित पटेलसोबत ‘नजर’ या चित्रपटात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री मीरा खान हिचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे

सन २००५ मध्ये अश्मित पटेलसोबत ‘नजर’ या चित्रपटात दिसलेली पाकिस्तानी अभिनेत्री मीरा खान हिचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत मीरा हॉलिवूडच्या ‘टायटॅनिक’ या गाजलेल्या चित्रपटाचे ‘माय हार्ट विल गो आॅन...’ हे लोकप्रीय गाणे गाताना दिसतेय. मीराचा हा व्हिडिओ एका टिव्ही शोचा आहे. ज्यात मीरा हे गाणे गुणगुणताना दिसतेय. पण हे गाणे गुणगुणल्यामुळेच मीराला ट्रोल व्हावे लागलेय.होय,फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत मीरा एका टीव्ही टॉक शोमध्ये बसलेली दिसतेय आणि सेलिन डियोन हिने गायलेले ‘माय हार्ट विल गो आॅन...’ हे गाणे गातेय. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लाखों लाईक्स मिळतील, असा मीराचा अंदाज असावा. पण झाले भलतेच. लाईक्स ऐवजी नेटिजन्सनी या गाण्यावरून मीराची चांगलीच खिल्ली उडवली. मीराचे ते गाणे ऐकून एका युजरला राहावले नाही आणि ‘प्लीज गाणे थांबव’ असे त्याने थेट सांगून टाकले. एकाने मीराचे हे व्हर्जन ऐकणे सेलिन डियोनच्या आयुष्यातील सगळ्यांत वाईट क्षण असेल, असे म्हटले. एकंदर काय तर, मीराचा व्हिडिओ पाहून अनेकांनी नाके मुरडली. तुम्हाला मीराचा हा व्हिडिओ कसा वाटतो, हे सांगायला विसरू नका. नेटिजन्सकडून ट्रोल होण्याची मीराची पहिली वेळ नाहीच. यापूर्वी मीराचे अनेक इंटरव्ह्यू आणि टॉक शोचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण काय तर मीराची इंग्रजी. प्रत्येक मुलाखतीत मीरा अतिशय अभिमानाने आपली तुटकी-फुटकी इंग्रजी मिरवताना दिसते. तिच्या या इंग्रजीमुळे ती अनेकदा ट्रोल झालीय. मध्यंतरी तिचा एक एमएमएसही लीक झाला होता. या एमएमएसमुळेही ती चर्चेत आली होती.मीरा ही पाकिस्तानातील एक लोकप्रीय अभिनेत्री आहे. सध्या मीरा तिच्या लग्नाच्या तयारीत गुंग असल्याचे कळतेय. मीराचा हा तिसरा विवाह असल्याचे कळतेय. या लग्नात मीरा भारतीय फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करणार असल्याचीही चर्चा आहे.