Join us

‘कान्स’च्या रेड कार्पेटवर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान करणार डेब्यू ; मात्र नर्व्हसनेसबद्दल केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 12:55 IST

सध्या बॉलिवूडमध्ये गाजत आहेत त्या ‘कान्स’ फेस्टिव्हलच्या चर्चा.. बॉलिवूडचे सर्व कलाकार कान्ससाठी रवाना झाले आहेत. रेड कार्पेटवर आता सर्व ...

सध्या बॉलिवूडमध्ये गाजत आहेत त्या ‘कान्स’ फेस्टिव्हलच्या चर्चा.. बॉलिवूडचे सर्व कलाकार कान्ससाठी रवाना झाले आहेत. रेड कार्पेटवर आता सर्व इच्छुक अभिनेत्रींचा रॅम्पवॉक होणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. मात्र, एक अभिनेत्री तिच्या कान्स फेस्टिव्हलच्या डेब्यूसाठी खूपच नर्व्हस आहे. कोण आहे ही अभिनेत्री? जी तिच्या कान्स फेस्टिव्हलच्या डेब्यूसाठी नर्व्हस आहे, ती म्हणजे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्सदरम्यान तिने तिच्या कान्स सोहळयाच्या डेब्यूविषयी ती किती उत्सुक आहे? आणि किती नर्व्हस आहे? हे बोलून दाखवले. तिच्या नर्व्हसनेसबद्दल ती म्हणते,‘मी खूप उत्साहित आहे पण तेवढीच नर्व्हस देखील. प्रत्येक जण मला सांगत आहे आणि मला असे वाटत आहे की, मी पाकिस्तानकडून या कान्सचे प्रतिनिधित्व करत आहे. मी एकटीच या कान्सरूपी मैदानात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उतरले आहे, असे वाटत आहे.’ तिला तिच्या वेशभूषेविषयी विचारले असता ती म्हणते,‘मला सध्या काहीही कल्पना नाही की, मी कोणत्या प्रकारचा ड्रेस घालणार आहे? मला केवळ एकाच गोष्टीची काळजी आहे की, कान्स रेड कार्पेट हे जगातील सर्वांत लांब रेड कार्पेट आहे. मी त्यावरून चालताना अडखळू नये किंवा पडू नये, एवढीच मी अपेक्षा करते.’ आत्तापर्यंत आपण हूमा कुरेशी, दीपिका पादुकोण, कंगणा राणौत यांचा अंदाज पाहिला आहे. आता सोनम कपूर आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांचे आऊटफिटस आपल्याला लवकरच बघायला मिळतील. पण, आता मात्र, सर्वांचे लक्ष माहिरा खान हिच्यावर लागून राहिले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान व अभिनेता रणबीर कपूर या दोघांचे सिगारेट ओढतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसले होते. माहिरा यात एका शॉर्ट बॅकलेस ड्रेसमध्ये होती. शिवाय तिच्या शरिरावरचे काही ‘लव्ह बाईट्स’ ही कॅमेऱ्याने टिपले होते. आता हे फोटो आणि माहिराच्या पाठीवरचे हे लव्ह बाईट्स यानंतर जितका काय बोभाटा व्हायचा तो झाला होता. पाकिस्तानी जनतेने तर माहिराला जाम फैलावर घेतले होते.