सध्या बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांसाठी चांगले दिवस आहेत. आतापर्यंत केवळ पाकिस्तानी गायकच बॉलीवूडमध्ये येत असत.
परंतु आता अनेक नवनवीन हीरो-हीरोईन हिंदी चित्रपटात दिसत आहेत. त्यामुळे ए. आर. मुरुगाडॉस यांच्या ‘कथ्थी’ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय कुमारसोबत जर पाकिस्तानी अॅक्ट्रेस माया अली काम करताना दिसली तर आश्चर्य वाटू देऊ नका.
‘इक्का’ नावाच्या या चित्रपटात मायाची वर्णी लागल्याचे बोलले जातेय. पाकिस्तानीमध्ये प्रसिद्ध व्हीडिओ जॉकी असलेली माया आता बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुळ चित्रपट शेतकरी आत्महत्येवर आधारित असून हिंदीमध्ये तो पाण्याची समस्येवर आधारित असणार आहे. सॉफ्ट ड्रिंक कंपनी कशा प्रकारे शेतीचे पाणी स्वत:च्या फायद्यासाठी वापरतात असा साधारण विषय असणार आहे. ‘
रोबोट २.०’ आणि ‘जॉली एलएलबी २’ची शुटिंग संपवून अक्षय या चित्रपटावर काम सुरू करणा आहे. म्हणजे आता महिरा खान आणि सबा कमारनंतर माया अलीचे नाव जोडले गेले आहे.
‘इक्का’मध्ये अक्कीसोबत पाकिस्तानी अॅक्ट्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 10:58 IST