Join us

​‘पद्मावती’ लागला मार्गी ! ‘राम-लीला’ पुन्हा येणार एकत्र!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 22:28 IST

‘पद्मावती’ मार्गी लागला आहे. होय, ‘बाजीराव मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ घेऊन येत आहेत. या गाण्याचे एक गाणे रेकॉर्डही ...

‘पद्मावती’ मार्गी लागला आहे. होय, ‘बाजीराव मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळी ‘पद्मावती’ घेऊन येत आहेत. या गाण्याचे एक गाणे रेकॉर्डही झाले. गायिका श्रेया घोषाल हिच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. ‘पद्मावती’मध्ये दीपिका पदुकोण मुख्य भूमिका साकारणार हे स्पष्ट झालेय. दीपिकाच्या अपोझिट कोण असणार ही उत्सूकता होतीच. आता तीही संपलीय. दीपिकाच्या अपोझिट रणवीर  सिंग असणार आहे. म्हणजेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या  ‘पद्मावती’या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची जोडी पाहायला मिळणार आहे.‘पद्मावती’साठी रणवीर सिंग आणि दीपिका यांची नावे निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ‘पद्मावती’चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी असणारे श्रेयस पुराणीक यांनी चित्रपटात दीपिकाची निवड निश्चित झाल्याचे ट्विट केल्याची माहिती एका वेबपोर्टलने दिली होती. मात्र, कालांतराने हे ट्विटर अकाऊंट गायब झाल्याचे निदर्शनास आले आणि श्रेयस पुराणीक यांनी आपले ट्विटर अकाऊंट नष्ट केल्याची अफवा देखील पसरली होती. पुराणीक यांच्याकडून भन्साळी यांनी काम काढून घेतल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली. दरम्यान, ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ला मिळालेल्या यशानंतर भन्साळी हे दीपिका आणि रणवीर यांच्यासोबत आणखी एका चित्रपटासाठी उत्सुक असल्याची चर्चा याआधीपासूनच बॉलीवूड वतुर्ळात होती. त्यानंतर  ‘पद्मावती’  साठी पुन्हा एकदा या दोघांची निवड झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ‘बाजीराव-मस्तानी’चे पटकथाकार प्रकाश कपाडिया हेच  ‘पद्मावती’ची पटकथा साकारत असल्याचेही सांगण्यात येत आहे.  }}}}