'या' तारेखला होऊ शकतो पद्मावती रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 15:40 IST
गेल्या वर्षी पासून 'पद्मावती' चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. निर्माते आज चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करू शकतात. ...
'या' तारेखला होऊ शकतो पद्मावती रिलीज
गेल्या वर्षी पासून 'पद्मावती' चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. निर्माते आज चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार 9 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सेन्सॉरने नुकतेच चित्रपटात काही बदल सुचवून चित्रपटाच्या रिलीजला हिरवा कंदील दाखवला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहण्यासाठी जयपूरमधील दोन प्रख्यात इतिहासकारांना आमंत्रित केले होते.या इतिहासकारांमध्ये प्रो. बी. एल. गुप्ता आणि प्रो. आर. एस. खांगराट यांचा समावेश आहे. गुप्ता राजस्थान विश्वविद्यालयात इतिहासाचे प्रोफेसर आहेत. तसेच त्यांनी मध्ययुगीन कालखंडांवर बºयाचशा पुस्तकांचे लेखन केले आहे, तर खांगराट अग्रवाल महाविद्यालयाचे प्रमुख आहेत यांना चित्रपट दाखवून नंतर चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्यात आले. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन्सला कात्री लावत ‘पद्मावती’ हे नाव बदलून ‘पद्मावत’ असे ठेवल्यास चित्रपटाला सर्टिफिकेट देण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरीही करणी सेनेने विरोधाची धार आणखी तीव्र केल्याचे दिसून येत आहे. करणी सेनेने चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केल्याचा आरोप केला आहे. मात्र संजय लीला भन्साळी यांनी हे आरोप सुरुवातीपासून नकारले होते. चित्रपटातील घुमर गाण्यात ही बदल करण्यास सेन्सॉरने सांगितले आहे आणि ते करण्यासाठी संजय लीला भन्साळी यांनी सहमती ही दर्शवली आहे. ALSO RAED : ‘पद्मावती’चे ‘पद्मावत’ होऊनही वाद थांबेना! राजघराण्याने केले सेन्सॉर बोर्डाला लक्ष्य!!हा चित्रपट आधी 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सातत्याने चित्रपटाला होणाऱ्या विरोधामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. यात चित्रपट राणी पद्मावतीची भूमिका दीपिका पादुकोणने साकरली आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी शाहिद कपूरने सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे. भन्साळींना ‘पद्मावती’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत.