PADMAVATI ASSAULT : मी काहीही चुकीचे करणार नाही; संजय लीला भन्साळींनी दिला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 12:43 IST
‘पद्मावती’वरून सुरु असलेला वाद आणि यामुळे शूटींगमध्ये येत असलेली बाधा यामुळे वैतागलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी पहिल्यांदा या विषयावर ...
PADMAVATI ASSAULT : मी काहीही चुकीचे करणार नाही; संजय लीला भन्साळींनी दिला विश्वास
‘पद्मावती’वरून सुरु असलेला वाद आणि यामुळे शूटींगमध्ये येत असलेली बाधा यामुळे वैतागलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी पहिल्यांदा या विषयावर आपली बाजू मांडली आहे. ‘पद्मावती’वर आक्षेप घेणाºया लोकांना विश्वास देणारे एक निवेदन त्यांनी जारी केले आहे. ‘पद्मावती’मध्ये काहीही आक्षेपार्ह असणार नाही. राणी पद्मावती हिच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल, असेही काहीही पडद्यावर दाखवण्याचे आमचे प्रयत्न नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी लिहिलेय की, ‘पद्मावती’ या माझ्या चित्रपटाबद्दल अनेक गैरसमज बाळगले जात आहेत. मी नेहमीसाठी हे गैरसमज दूर करू इच्छितो. ‘पद्मावती’ हा स्वत:च्या आत्मसन्मानासाठी लढणाºया एका राजपूत राणीची कथा आहे. चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये कधीही राणी पद्मावती व अलाऊद्दीन खिल्जी यांच्यावर चित्रीत रोमॅन्टिक गाणे नव्हते. आम्ही मीडियाद्वारे अनेकदा यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. याऊपर चित्रपटाचे चित्रीकरण हाणून पाडण्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. कलाकार या नात्याने अभिव्यक्ति स्वातंत्र काय, हे मी जाणतो. मात्र या स्वातंत्र्यासोबत येणाºया जबाबदाºयांचे भानही मी ठेवतो. मी काही राजपूत नेत्यांना भेटलो. माझ्या भूमिकेला या नेत्यांचे समर्थन आहे.ALSO READ : PADMAVATI ASSAULT : कोल्हापुरातील ‘पद्मावती’च्या सेटवर तोडफोड; आग लावण्याचे प्रयत्न!‘पद्मावती’त राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण करण्यात आल्याचा काहींचा आक्षेप आहे. याचमुळे सध्या भन्साळींच्या या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला जोरदार विरोध केला जात आहे. गत जानेवारीच्या अखेरिस राजस्थानच्या जयपूर नजिक जयगढ येथे ‘पद्मावती’चे शूटींग सुरु असताना करणी सेनेने याठिकाणी धिंगाणा घातला होता. या प्रकारानंतर भन्साळींनी कोल्हापुरात ‘पद्मावती’चा सेट उभारला होता. पण अलीकडे काही अज्ञात व्यक्तिंनी या सेटची तोडफोड करत त्याल आग लावण्याचा प्रयत्न केला होता.