Join us
Daily Top 2Weekly Top 5

Padman challenge:पब्लिसिटीचा अनोखा फंडा,हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन या सेलिब्रेटींनी फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 15:42 IST

'पॅडमॅन' हा सिनेमा  9 फेब्रुवारीला प्रदर्शित  होत आहे.त्यामुळे पॅडमॅन सिनेमाची पब्लिसिटी करण्यासाठी बॉलिवूडचा अक्की म्हणजेच अक्षय कुमारने नवीन शक्कल ...

'पॅडमॅन' हा सिनेमा  9 फेब्रुवारीला प्रदर्शित  होत आहे.त्यामुळे पॅडमॅन सिनेमाची पब्लिसिटी करण्यासाठी बॉलिवूडचा अक्की म्हणजेच अक्षय कुमारने नवीन शक्कल लढवली आहे.मुळात सिनेमाच्या प्रमोशनचा हा अनोखा फंडा शोधून काढलाय अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाने.अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाची निर्माती ही त्याची पत्नी ट्विंकल खन्ना आहे.सोशल मीडियावर हॅशटॅग पॅडमॅन खूप ट्रेंड होत आहे.ट्विंकलने नुकतेच 'पॅडमॅन चॅलेंज'ची सुरुवात केली आहे.या चॅलेंजसाठी एका सेलिब्रेटीने दुस-या सेलिब्रेटीचे नाव नॉमिने करत  आपल्या हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करायचा आहे.ट्विकलने हे चॅलेंज आमिर खानला देताच आमिर खानने ही हे चॅलेंज स्विकारत सोशल मीडियावर सॅनेटरी पॅड हातात घेऊन एक फोटो पोस्ट केला आणि त्या फोटोला एक समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. त्यानंतर आमिरनेही या फोटोसोबत शाहरुख खान, सलमान खान आणि अमिताभ बच्चनला या चॅलेजसाठी नॉमिनेट केले आहे.ट्विंकलप्रमाणेच अक्षय कुमारने हाता पॅड घेऊन एक फोटो पोस्ट करत आलिया भट, दीपिका पदुकोण आणि विराट कोहलीला हे चॅलेंज दिले आहे.आलिया भटने, राधिका आप्टेने,सोनम कपूर यांनीही आपले फोटो शेअर करत वेगवेगळ्या सेलिब्रेटींना हे चॅलेंज दिले आहे. मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन या सगळ्यावर भाष्य करणारा पॅडमॅन हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.या सिनेमात राधिका आपटे महत्त्वाची भूमिका साकारत आहे.पद्म पुरस्कार विजेते अरुणाचलम मुरुगनाथन यांच्या जीवनावर पॅडमॅन हा सिनेमा आधारित असून खिलाडी अक्षय कुमार यांत एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.याशिवाय अभिनेत्री सोनम कपूरचीही या सिनेमात लक्षवेधी भूमिका आहे.'पॅडमॅन' हा सिनेमा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केला असून येत्या  9 फेब्रुवारीला हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  

Also Read:पहिल्या मासिक पाळीचे राधिका आपटेच्या घरी जंगी सेलिब्रेशन,आईकडून मिळाले 'हे' खास गिफ्ट!

या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला मासिक पाळी आणि या काळात वापरण्यात येत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन विषयी अनेक गोष्टी कळल्या असे त्याने सांगितले. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदा सॅनिटरी पॅडला हात लावला. याविषयी अक्षय कुमार सांगतो, मी सॅनिटरी पॅडविषयी ऐकले होते. पण कधीच मी सॅनिटरी नॅपकिनला हात लावला नव्हता. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच दीड-दोन वर्षांपूर्वी सॅनिटरी नॅपकिन हातात घेतला.महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या देशातील सगळ्या महिलांनी त्यांच्या मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन वापरला पाहिजे असे या सिनेमाद्वारे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे.