Join us
Daily Top 2Weekly Top 5

​आणखीच बोल्ड होऊन परतलीयं ‘ओए लकी लकी ओए’ची ही अभिनेत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 15:21 IST

आपल्या गायकीने अनेकांना वेड लावणारे गायक राहत फतेह अली खान यांच्या ‘बंजारे’ या गाण्याचा टीजर रिलीज झालायं. या टीजरची बातमी होण्याचे कारण म्हणजे, अभिनेत्री नीतू चंद्रा.

आपल्या गायकीने अनेकांना वेड लावणारे गायक राहत फतेह अली खान यांच्या ‘बंजारे’ या गाण्याचा टीजर रिलीज झालायं. या टीजरची बातमी होण्याचे कारण म्हणजे, अभिनेत्री नीतू चंद्रा. होय, ‘ओए लकी लकी ओए’ या चित्रपटातील ही अभिनेत्री राहत फतेह अली खान यांच्या या सिंगलमध्ये हॉटनेटचा तडका लावताना दिसणार आहे.किर्गिस्तानमध्ये या सिंगलचे शूटींग झाले आहे. एकापेक्षा एक सुंदर लोकेशन्सवर नीतू आपल्या हॉट अदा दाखवते आहे. गाण्याच्या टीजरमध्ये नीतूचा बोल्ड अंदाज बघण्यासारखा आहे. सध्या नीतू चंद्राकडे बॉलिवूडचा कुठलाही प्रोजेक्ट नाही. पण राहत फतेह अली खान यांचे हे सिंगल तिच्यासाठी मोठी संधी ठरू शकते.  श्रुति वोहराने दिग्दर्शित केलेले हे गाणे अनुपमा राग हिने लिहिलेय.यापूर्वी नीतू चंद्रा ‘ट्रॅफिक सिग्नल’ व ‘ओए लकी लकी ओए’मध्ये दिसली होती. या दोन्ही चित्रपटांतील नीतूच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. मात्र याऊपरही यानंतर तिला बॉलिवूडचा अन्य कुठलाच प्रोजेक्ट मिळाला नाही. बॉलिवूडमधून दीर्घ काळापासून गायब झालेली नीतू सध्या निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावतेयं. प्रादेशिक चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रात तिने पाऊल ठेवलेय. नीतूने प्रोड्यूस केलेल्या ‘मिथिला मखान’ या भोजपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. नीतूबद्दल आणखी सांगायचे झाल्यास ती तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे. १९९७ मध्ये हाँगकाँग येथे झालेल्या वर्ल्ड तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. नीतूने अनेक तेलगू व तामिळ चित्रपटांतही काम केले आहे. तूर्तास तिच्या हॉट अदांनी सजलेल्या राहत फतेह अली खान यांच्या गाण्याचा टीजर तुम्ही पाहू शकता. हा टीजर आणि यातील नीतूच्या हॉट अदा कशा वाटल्या ते सांगायला विसरू नका.