राज अर्थात शाहरूख खान आणि सिमरन म्हणजेच काजोल यांच्यावर चित्रीत करण्यात आलेला हा सीन कुणीच विसरणे शक्य नाही. स्वत:पासून दूर जात असलेल्या सिमरनने एकदा तरी पलटून बघावे, याची आस लावून बसलेला राज ‘पलट...पलट...’ म्हणतो आणि खरचं काही अंतरावर गेल्यावर सिमरन राजकडून पलटून पाहते, असा हा सीन होता. हा सीन प्रचंड गाजला होता. पण हा सीन एका हॉलिवूड चित्रपटातील सीनची जशीच्या तशी कॉपी होता, असे आता समोर आले आहे.
१९९३ मध्ये आलेल्या क्लिंट इस्टवूडचा ‘इन द लाइन आॅफ फायर’ या हॉलिवूड चित्रपटातून तो उचलला गेला होता. या चित्रपटानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ रिलीज झाला होता. आमच्यावर विश्वास बसत नसेल तर सोबत दिलेला व्हिडिओ तुम्ही एकदा बघायलाच हवा.
लेखिका आणि दिग्दर्शक नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात आदित्य चोप्रा याने ‘पलट’ हा सीन हॉलिवूड चित्रपटातून उचलण्यात आल्याचे मान्य केले आहे. ‘इन द लाइन आॅफ फायर’ पाहिल्यानंतर त्यातील तो सीन माझ्या मेंदूत रूतून बसला होता. पण काही दिवसांनी मी तो विसरलो. यानंतर ‘दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’ची स्क्रिप्ट लिहित असताना मला तो सीन पुन्हा आठवला आणि मी तो सीन लगेच माझ्या स्क्रिप्टमध्ये घेतला, अशी कबुली आदित्यने दिल्याचे या पुस्तकात नमूद आहे.