Join us

आमचा ‘किसींग सीन’ सर्वात चांगला -पूजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 15:15 IST

 पूजा हेगडे आणि हृतिक रोशन हे सध्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. चित्रपटातील गाणी, संगीत आणि डान्सिंग स्टेप्स यांच्याविषयी खुप ...

 पूजा हेगडे आणि हृतिक रोशन हे सध्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटासाठी चर्चेत आहेत. चित्रपटातील गाणी, संगीत आणि डान्सिंग स्टेप्स यांच्याविषयी खुप कौतुक ऐकावयास मिळत आहे.त्याचसोबत पूजा म्हणते,‘ माझा आणि हृतिकचा किसींग सीन देखील खुप चांगला आहे. आत्तापर्यंत आॅनस्क्रीन किसपैकी आम्ही चित्रपटासाठी केलेला सीन बेस्ट आहे. सेटवर किस करणे फारच कठीण काम असते.तुमच्या अवतीभवती खुप लोक असतात. त्यांच्यासमोर तुम्हाला किस करावा लागतो. आम्ही दोघे खुप चांगले मित्र आहोत. पण, तरीही आम्ही दोघे खुपच नर्व्हस होतो. आम्ही जरी किस करत होतो तरीही आम्ही असे समजतो की, आमचे कॅरेक्टर्स किस करत आहेत. असे समजल्याशिवाय ती कम्फर्ट लेव्हल येतच नाही. ’