Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकदा तरी जरुर भेट द्या बॉलिवूड थीम रेस्टॉरंटला, बनले खवय्येप्रेमींचे आवडते डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 10:22 IST

सुवर्णा जैनभारतात सिनेस्टार्स आणि क्रिकेटर्सची तुफान लोकप्रियता आहे.आपल्या लाडक्या कलाकारांवर किंवा क्रिकेटर्सवर भारतीय अक्षरश: जीव ओवाळून टाकतात.काही रसिकांनी ...

सुवर्णा जैनभारतात सिनेस्टार्स आणि क्रिकेटर्सची तुफान लोकप्रियता आहे.आपल्या लाडक्या कलाकारांवर किंवा क्रिकेटर्सवर भारतीय अक्षरश: जीव ओवाळून टाकतात.काही रसिकांनी तर आपल्या लाडक्या स्टार्स आणि क्रिकेटर्सना देवाचा दर्जा दिला आहे. यासोबतच भारतीय खाण्याचेही तितकेच शौकिन आहेत.चवदार,रुचकर पदार्थ खाण्यासाठी भारतीय नेहमी तयार असतात. त्यामुळेच की काय कलाकार, क्रिकेटर आणि खाणं पिणं या गोष्टींवर असलेले आपले प्रेम दाखवण्यासाठी भारतीय काहीही करु शकतात. त्यामुळेच बॉलिवूड थीमवर आधारित रेस्टॉरंटच्या माध्यमातून काहींनी आपलं कलाकार आणि खाण्यापिण्यावरील प्रेम दाखवलं आहे.तुम्हालाही अशा कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर ही माहिती आवर्जून वाचा.शहेनशाह रेस्टॉरंटमहानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे कोट्यवधी चाहते आहेत.त्यांच्या अशाच एका चाहत्याने शहेनशहा रेस्टॉरंटच्या माध्यमातून बिग बींवरील आपलं प्रेम दाखवून दिले आहे.रेस्टॉरंटच्या भिंती, विटा, दगडं आणि मेन्यू प्रत्येक गोष्टींवर बिग बींच्या सिनेमांची नावं पाहायला मिळतात. या ठिकाणी अमिताभ यांची आवडती डिश पनीर टिक्का, चायनीज डिश, हॉटशॉट पोटॅटो, सुर्ख नीर,दाल रेसिडेन्सी या डिश पाहायला मिळतात.श्रीदेवी रेस्टॉरंटदिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची रसिकांमध्ये प्रचंड क्रेझ होती.रसिकांनीच चांदनीला पहिली लेडी सुपरस्टार बनवलं.आपल्या लाडक्या अभिनेत्रीवरील प्रेमसुद्धा रसिक कधीच लपवू शकले नाहीत. त्यांची लोकप्रियता अशी आहे की भारताच्या विविध भागात त्यांच्या नावाने रेस्टॉरंट उघडण्यात आलेत. मुंबईच्या सांताक्रुजमध्ये श्रीदेवीच्या नावाचे एक रेस्टॉरंट सुरु करण्यात आलंय. चेन्नईतही श्रीदेवी यांच्या एका फॅनने त्यांच्या नावाचे एक रेस्टॉरंट उघडले आहे. याची खासियत म्हणजे तिथे त्यांच्या 100 सिनेमांच्या नावाच्या डिश ठेवण्यात आल्या आहेत. यासोबतच हॉटेल समोर श्रीदेवीचे एक मोठे पोस्टर लावण्यात आले आहे. यासह भीमावरम, आंध्र प्रदेश, कल्याणमध्येही श्रीदेवी यांच्या नावाचे रेस्टॉरंट आहे. त्यांचे फॅन्स भारतातच नाहीतर परदेशातही आहेत. याचीच झलक सिंगापूरमध्येही पाहायला मिळते. सिंगापुरच्या रेसकोर्स रोड इथल्या 'देल्ही रेस्टॉरंट' मध्ये श्रीदेवीच्या नावाची बाहुली लावण्यात आली आहे.गरम-धरम धाबा ते थेके रेस्टॉरंटबॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांच्या अभिनयावर प्रेम करणारे अनेक रसिक आहेत.धरमपाजींच्या अशाच एका फॅननं गरम-धरम धाबा ते थेके रेस्टॉरंटच्या माध्मातून त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.धरमजी पंजाबी असल्याने इथं जास्तीत जास्त पंजाबी डिशेस पाहायला मिळतात. तसंच रेस्टॉरंटच्या भिंतींवरही त्यांच्याच सिनेमांचे डायलॉग पाहायला मिळतात. बाशा आणि कबाली पिझ्झा रेस्टॉरंटया ठिकाणी दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांची जादू पाहायला मिळते. रेस्टॉरंटच्या चारही बाजूला थलायवाचे फोटो पाहायला मिळतात. शिवाय डिशेसनाही बॉस रजनीचीच सिनेमातील नावं देण्यात आली आहेत.भाईजान रेस्टॉरंटदबंग सलमान खानच्या एका फॅनने त्याच्या नावाने मुंबईतील वांद्रे भागात हे रेस्तरॉ उघडलं आहे. रेस्टॉरंटमध्ये चोहीकडे सलमानचे फोटो पाहायला मिळतात. इथं मिळणा-या सलमानच्या सिनेमांच्या नावावरुन डिशेस सा-यांना भावतात.हिरो नंबर वन रेस्टॉरंटबॉलिवूडचा हिरो नंबर वन असं टॅग मिळवलेला अभिनेता म्हणजे गोविंदा. त्याच्या नंबर वन सिनेमांची सीरीज गाजली होती. त्यामुळेच त्याच्या एका फॅनने या रेस्टॉरंटमधून गोविंदावरील प्रेम व्यक्त केले आहे.दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात असणा-या या रेस्टॉरंटमध्ये गोविंदाच्या सिनेमातील नावांच्या डिश मिळतात.कॅलेंडर किचन रेस्टॉरंटमिस्टर इंडिया सिनेमातील कूक कॅलेंडर आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे.. यावरुनच प्रभावित होऊन दिल्लीत हे रेस्टॉरंट उघडण्यात आले आहे.या ठिकाणी वेगवेगळ्या डिशेश लोकप्रिय आहेत.७० एमएम हैदराबाद रेस्टॉरंटबॉलिवूड थीमवर आधारित या रेस्टॉरंटमध्ये चोहीबाजूला विविध सिनेमांचे पोस्टर्स पाहाला मिळतात.मुंबई मॅटिनी रेस्टॉरंटमुंबईतील हे रेस्टॉरंटसुद्धा बॉलिवूड थीमवर आधारित आहे.या ठिकाणी जुन्या गाजलेल्या सिनेमांचे आणि कलाकारांचे पोस्टर्स खवय्यांचा लक्ष वेधून घेतातसुपरस्टार रेस्टॉरंटदिल्लीतील हे रेस्टॉरंटसुद्धा खवय्येप्रेमींचे आवडते डेस्टिनेशन आहे.या ठिकाणी विविध अभिनेत्यांच्या डिशेस मिळतात.