ओमपुरीची नसिरुद्दीन शाहवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 19:08 IST
. शाह यांच्यावर टिका करताना ओम पुरी म्हणाले की, शाहने राजेश खन्नाला सुमार अभिनेता का म्हटले ? काय त्यांनी ...
ओमपुरीची नसिरुद्दीन शाहवर टीका
. शाह यांच्यावर टिका करताना ओम पुरी म्हणाले की, शाहने राजेश खन्नाला सुमार अभिनेता का म्हटले ? काय त्यांनी खन्ना यांचे चित्रपट बघितलेले आहेत का ? मला त्यांचा चित्रपट ‘आखिरी खाट’ व ‘बहारों के सपन’े अजूनही लक्षात आहे. हे चित्रपट काही व्यावसायिक नव्हते. त्यानंतर खन्ना यांचा हिट चित्रपट ‘अमर प्रेम’ आठवणीत आहे. राजेश खन्नाला जे यश मिळाले त्याचे शाह व मी स्वप्नातही बरोबरी करु शकत नाही. मृत अभिनेत्याविषयी असे बोलणे योग्य नाही. नसिरने सलमान खान, शाहरुख खान व अमिताभ बच्चन यांच्याविषयी का टीका केली नाही. त्यांच्याकडून याचे उत्तरही मिळाले असते. खन्ना हे एक सुमार अभिनेते होते, त्यांच्यामुळे हिंदी चित्रपटाची तेव्हा प्रगती झाली नाही. अशी टीका शाहने केली होती. टिंकल खन्नाने सुद्धा यासंदर्भात शाह यांच्या टीका केलेली आहे.