OMG!! एक्स-वाईफचे चाहते झाले अॅक्टिव्ह! करण सिंह ग्रोव्हर अन् बिपाशा बासूला म्हटले ‘बंदर अन् लंगूर की जोडी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 11:45 IST
करण सिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू सध्या चर्चेत आहेत. होय, करणची एक्स वाईफ जेनिफर विंगेटच्या चाहत्यांनी बिपाशा आणि करण या दोघांनाही असे काही आडव्या हातांनी घेतले की, दोघांच्याही नाकीनऊ आले.
OMG!! एक्स-वाईफचे चाहते झाले अॅक्टिव्ह! करण सिंह ग्रोव्हर अन् बिपाशा बासूला म्हटले ‘बंदर अन् लंगूर की जोडी’!
करण सिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासू सध्या चर्चेत आहेत. होय, करणची एक्स वाईफ जेनिफर विंगेटच्या चाहत्यांनी बिपाशा आणि करण या दोघांनाही असे काही आडव्या हातांनी घेतले की, दोघांच्याही नाकीनऊ आले. सध्या करण व बिपाशा दोघेही लंडनमध्ये हॉली डे एन्जॉय करत आहेत. आता हा हॉलीडे प्लान स्वत: पुरता ठेवला तर काहीच हरकत नाही. पण करण व बिप्सने या ठिकाणचा एक खासगी क्षण ‘सोशल’ केला आणि मग? मग काय, दोघांनाही ट्रोल व्हावे लागले.त्याचे झाले असे की, करणला बिपाशासोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर करण्याचा मोह आवरता आला नाही. स्वत:चा बिपाशाच्या मांडीवर डोके ठेवून निवांत पडलेला असतानाचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला. केवळ इतकेच नाही तर या फोटोसोबत बिपाशासाठी एक प्रेमळ मॅसेज लिहायलाही तो विसरला नाही. ‘जगातील सर्वाधिक सुंदर ठिकाणी मी सध्या आहे. यापेक्षा मला अधिक काय हवे आहे?’ असे करणने लिहिले. इकडे करणने हा फोटो शेअर केला अन् तिकडे जेनिफर विंगेटच्या चाहत्यांचा पारा चढला. मग काय या चाहत्यांनी बिप्स आणि करणला अगदीच अर्वाच्च शब्दांत ट्रोल करणे सुरु केले. ‘एक बंदरने दुसरे लंगूर को पकडा है...’ इथपासून चाहत्यांनी सुरुवात केली. आता इतक्या वाईट कमेंट्स वाचल्यानंतर बिप्स अन् करणला वाईट वाटणे तर स्वाभाविक आहेच. पण अद्याप तरी बिपाशा व करणने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘दिल मिल गये’ मालिकेच्या सेटवर जेनिफर आणि करणची भेट झाली होती. आधी दोघांची मैत्री झाली अन् मग दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काहीच महिन्यांत दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करणचे आधीच लग्न झाले होते. पण जेनिफरसाठी करणने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. जेनिफर व करणचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये खटके उडायला सुरूवात झाली. दोघांनाही एकमेकांसोबत राहणेही अशक्य वाटू लागले तेव्हा यांनी वेगळे होण्याच निर्णय घेतला. यानंतर करणच्या आयुष्यात बिपाशा आली. ALSO READ : जॉन अब्राहमसोबत ब्रेकअपनंतर अनेक वर्षांनी बिपाशा बासूने केले 'हे' वक्तव्य