Join us

OMG !! ‘या’ भीतीने सुंदर दिसण्यासाठी धडपडते वाणी कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 16:16 IST

घराबाहेर पडताना आपण सुंदर दिसावं, हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. बॉलिवूडचे सेलिब्रिटी याबद्दल जरा जास्तचं सतर्क असतात. पण वाणी कपूरचे ...

घराबाहेर पडताना आपण सुंदर दिसावं, हा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. बॉलिवूडचे सेलिब्रिटी याबद्दल जरा जास्तचं सतर्क असतात. पण वाणी कपूरचे विचाराल तर ती एका भीतीपोटी सुंदर दिसण्यासाठी धडपडते. ‘बेफिके्र’मध्ये जलवे दाखवणारी वाणी कपूर चित्रपटात येण्यापूर्वी मॉडेल होती, हे तर तुम्हाला ठाऊक असेल. पण तिच्याबद्दलची आणखी एक गोष्ट कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी. चित्रपटात येण्यापूर्वी वाणी मॉडेलच नव्हती तर मॉडेल्सचा मेकअप सुद्धा करायची. मुंबईत सध्या सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीकदरम्यान वाणी फॅशन डिझाईनर रितु कुमारच्या शोची स्टॉपर होती. यावेळी वाणी स्वत:बद्दल भरभरून बोलली आणि बोलण्याच्या ओघात मनातील एक भीतीही तिने बोलून दाखवली. होय, एखादा वाईट फोटो कुठेतरी छापून येईल आणि मगं फॅशन जगतात आपले हसू होईल, ही भीती वाणीला सतत छळत असते. ती सांगते, मी एक अभिनेत्री आहे आणि कदाचित म्हणून एक भीती माझ्या मनात सतत असते. माझा एखादा वाईट फोटो छापून येईल आणि सगळे मला हसतील, याची मला सतत भीती वाटत असते. त्यामुळे घराबाहेर पडताना मी अतिशय सतर्क असते. मी सुंदर दिसावी, हा माझा प्रयत्न असतो, असे वाणीने सांगितले.ALSO READ : आता ‘किसींग गर्ल’ वाणीची एकच इच्छा!वाणीने सांगितले, ‘आदित्य चोप्रा को गुस्सा क्यों आता है?’वाणी मॉडेल कशी झाली, हेही तिने सांगितले. तिने सांगितले की, प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिकी कपूर यांच्याकडे मी मेकअप करून देत होते. याचवेळी फॅशन डिझाईनर मानव याची नजर माझ्यावर गेली आणि त्याने मला त्याच्या शोमध्ये येण्यासाठी विचारले आणि मी होकार दिला आणि मी मॉडेलिंगच्या दुनियेत आले.