Join us  

बाबो..! विद्या बालननं करण जोहरसमोर सांगितलं तिच्या बेडरूम सीक्रेट्सबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:25 PM

विद्या बालनने आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफबद्दलचे बरेच खुलासे केले आहेत.

कहानी, पा आणि शकुंतला देवी यासारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने आपल्या प्रत्येक भूमिकेतून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. विद्याने प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. नेहमी डिसेंट दिसणारी विद्याने करण जोहरच्या चॅट शोमध्ये आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. यादरम्यान विद्याने तिचे बेडरूम सीक्रेट्सदेखील शेअर केले आहेत.

करण जोहरने विद्याला प्रश्न केला की बेडरूमची लाइट ऑन ठेवायला आवडते की बंद ठेवायला. त्यावर विद्या म्हणाली की, तिला हलका उजेड आवडतो. मग करणने प्रश्न विचारले की, बेडरूममध्ये तिला म्युझिक आवडते की कँडिल? त्यावर अभिनेत्री म्हणाली की, तिला दोन्ही आवडते.

विद्या म्हणाली की तिला कॉटनची बेडशीट आवडते. मग करणने विचारले की बेडवर पडल्यानंतर तुला काय आवडते. चॉकलेट, ग्रीन टी. मग आणखी एक राउंड. विद्याने मजेशीर उत्तर देत सांगितले की, पाणी. कारण तहान भागवता भागवता तिला आणखी तहान लागते. विद्याने करण जोहरच्या प्रश्नांची उत्तर बेधडकपणे दिली.

अभिनेत्री विद्या बालनने प्रत्येक भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. मग द डर्टी पिक्चरमधील तिचा अवतार पाहून सर्व अवाक् झाले होते. चित्रपटात सिल्कच्या भूमिकेत विद्याने बरेच बोल्ड सीन दिले होते.

टॅग्स :विद्या बालनकरण जोहर