Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! ​ शाहिद कपूरच्या गैरहजेरीत एकटी इव्हेंटमध्ये पोहोचली मीरा राजपूत, लोकांनी केले दुर्लक्ष!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 13:06 IST

खरे तर शाहिद कपूरशिवाय त्याची बेटरहाफ मीरा राजपूत कुठल्याही बॉलिवूड इव्हेंटला जात नाही. पण अलीकडे मात्र तशी वेळ आलीच. ...

खरे तर शाहिद कपूरशिवाय त्याची बेटरहाफ मीरा राजपूत कुठल्याही बॉलिवूड इव्हेंटला जात नाही. पण अलीकडे मात्र तशी वेळ आलीच. त्याचे झाले असे की, एका अवार्ड शोमध्ये शाहिदला अवार्ड मिळणार होता. पण शाहिद ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या शूटींगमध्ये व्यस्त असल्याने तो या सोहळ्याला हजर राहू शकणार नव्हता. त्यामुळे शाहिदच्या वतीने मीरा हा पुरस्कार स्वीकारणार, असे ठरले आणि त्यानुसार, मीराने या अवार्ड शोमध्ये एकटीने जायचा निर्णय घेतला. पण  या अवार्ड शोमध्ये आपल्यासोबत असे काही घडेल, याची कल्पना मीराने केली नसावी. होय, या अवार्ड शोमध्ये मीरा पोहोचली खरी पण काही चार-दोन माणसं सोडली तर इतरांनी म्हणे मीराला साधे नोटीसही केले नाही.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा या अवार्ड शोमध्ये एकटी आली आणि पूर्णवेळ एका टेबलावर शांतपणे बसून राहिली. चार दोघांनी तिला हाय-हॅलो केले. पण इतरांनी मात्र मीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. ज्यांनी गतवर्षी शाहिदच्या बर्थ डे पार्टीत भाग घेतला होता, त्या लोकांनीही मीराकडे दुर्लक्ष केले. अर्थात यामुळे मीराला काहीही फरक पडला नाही. तिने शाहीदच्या वतीने पुरस्कार स्वीकारला आणि नंतर बराच वेळ एकटीने बसून शो एन्जॉय केला. तसेही मीरा बॉलिवूडच्या लोकांसोबत फार कमी मिसळताना दिसते. तिचा बहुतांश वेळ कुटुंबासोबतच जातो. विशेषत: मुलगी मीशा हिच्यासोबत मीरा बहुतेक वेळ घालवते.

ALSO READ : घराजवळील कुंटणखान्यामुळे शाहिद कपूर अन् मीरा राजपूत झाले त्रस्त; सोडणार राहाते घर!

मीरा शाहिदपेक्षा वयाने १३ वर्षे लहान आहे आणि दोघांचेही अरेंज मॅरेज आहे. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली. अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय. तेही अगदी उत्तमरित्या. सेलिब्रिटी पतीसोबत ती तेवढ्याच आत्मविश्वासाने उभी राहिली. इतकी की, बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नसताना रिअ‍ॅलिटी शोमध्ये कॅमेरा फेस करायला ती कचरली नाही.