Join us

OMG! सारा अली खान म्हणून घालते पांढऱ्या रंगाचे कपडे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 20:54 IST

बॉलिवूडचे अनेक बडे स्टार ज्योतिषावर, अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात. त्यात आता साराचेही नाव सामील झाले आहे.

सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान सध्या तिचा डेब्यू सिनेमा ‘सिम्बा’मुळे चर्चेत आहे. अलीकडे सारा अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. पण यावेळी एक गोष्ट सगळ्यांनीच हेरली. ती म्हणजे, सारा बहुतेकदा पांढ-या रंगाच्या आऊटफिटमध्येचं दिसली. 

पांढ-या रंगाचा सलवार कमीज अशा अगदी साध्या पेहरावातचं तिला पाहिले गेले. कदाचित पांढरा रंग हा साराच्या आवडीचा रंग असावा, असेच अनेकांना यामुळे वाटले. पण असे नाहीये. पांढ-या रंगाचे कपडे यामागे एक वेगळेच कारण आहे. 

होय, सूत्रांचे मानाल तर सारा कुण्या ज्योतिषीच्या म्हणण्यावरून सध्या केवळ पांढ-या रंगाचे कपडे घालते आहे. साराच्या ग्रहदशेनुसार तूर्तास तिला पांढ-या रंगाचे कपडे घालण्याचा सल्ला ज्योतिषीने दिला आहे. केवळ इतकेच नाही तर नियमित शनि मंदिरात जाण्याचा सल्लाही तिला देण्यात आला आहे.

 अलीकडे अनेकदा सारा मंदिराबाहेर दानधर्म करताना दिसल. कदाचित त्यामागेही हेच कारण आहे.आता साराचे हे प्रयत्न तिला किती यश, किर्ती मिळवून देतात, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. बॉलिवूडचे अनेक बडे स्टार ज्योतिषावर, अंकशास्त्रावर विश्वास ठेवतात. त्यात आता साराचेही नाव सामील झाले आहे.

टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान रणवीर सिंग