Join us

​OMG! रणवीर-दीपिकाचेही ब्रेकअप?? वाचा, काय म्हणाली दीपिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 16:40 IST

शिर्षक वाचून धक्का बसला ना?? बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक अशा ब्रेकअपच्या बातम्या येत आहे. अलीकडे सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया ...

शिर्षक वाचून धक्का बसला ना?? बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक अशा ब्रेकअपच्या बातम्या येत आहे. अलीकडे सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या बे्रेकअपची बातमी येऊन धडकली आहे. ‘रामलीला’नंतर दीपिका व रणवीरच्या अफेअरची बातमी आली. दोघेही एकमेकांत गुंतलेले दिसले. अनेक ठिकाणी ‘इशारों इशारों में’ रणवीर व दीपिका त्याची कबुलीही देताना दिसले. पण ‘बाजीराव मस्तानी’नंतर दोघांमध्ये कुठल्याशा कारणावरून मतभेद झाल्याचे समजते. विश्ोष म्हणजे हे मतभेद दूर करण्याचे प्रयत्नही दोघांनी कले नाही. एका मुलाखतीदरम्यान खुद्द दीपिकालाच याबाबत विचारण्यात आले. रणवीरसोबत ब्रेकअपची बातमी खरी आहे का? असा प्रश्न तिला करण्यात आला. यावर यात लपवण्यासारखे काहीही नाही, असे दीपिका म्हणाली. मीडियातील अफवांवर मी काहीही बोलणार नाही, हे मी आधीच सांगितले आहे. आत्ताही मी बोलणार नाही. रणवीर माझ्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याचे स्थान कधीच बदलत नाही,असेही ती म्हणाली. आता रणवीर आयुष्याचा भाग आहे हे दीपिकाने सांगितले. पण ब्रेकअपचा प्रश्न तिने टाळला. आता आम्ही काय समजावे??