Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​श्रीदेवीने मुलींसाठी बनविला ‘नो लेट नाईट रुल..!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2017 15:05 IST

मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा विशेषत: आईला त्यांची जास्त काळजी वाटू लागते. मग ती आई कुणीही असो. की त्यापैकी ...

मुली जेव्हा मोठ्या होतात तेव्हा विशेषत: आईला त्यांची जास्त काळजी वाटू लागते. मग ती आई कुणीही असो. की त्यापैकी एक आई म्हणजे बालिवूड अभिनेत्री श्रीदेवी होय. जान्हवी आणि खूशी ह्या श्रीदेवीच्या मुली असून त्यांची चिंता श्रीदेवीला सतावू लागली आहे. २०१६ साली जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाला किस करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो पाहिल्यानंतर श्रीदेवीने जान्हवी आणि खूशी दोघांसाठीही ‘नो बॉयफ्रेंड रुल’ बनविला होता. मात्र आता जान्हवी कपूर 'सैराट' च्या रिमेकसाठी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असून तिच्या चित्रपटांत येण्यापूर्वी श्रीदेवीने अजून एक नवीन नियम बनविला आहे. श्रीदेवीने एका मुलाखतीत सांगितले की ‘मी जान्हवी आणि खूशीसाठी काही नियम बनविले आहेत. दोघांना घरी कधी यायचे आणि किती वेळपर्यंत बाहेर थांबायचे हे चांगले माहीत आहे. जर त्यांना यायला लेट झाले तर मी त्यांना फोनवर फोन करणे सुरु करते.’श्रीदेवीने सांगितले की ‘कधीकधी त्यांना जास्त वेळ घराबाहेर राहायचे असते तर ते मला थोडी तडजोड करायला सांगतात. पण दोघीही मी सांगितलेले ऐकतात.’ ‘मी मुलींबाबत फार काळजी करते मला त्या दोघी घराबाहेर गेल्या की घरी येईपर्यंत मला त्यांची काळजी वाटते.’‘दोघीही त्याच्या तब्बेतीबद्दल फार जागरुक आहेत त्यामुळे त्याबाबतीत मला त्यांना कंट्रोल करण्याची गरज वाटत नाही.’ फेब्रुवारी २०१७ मध्ये एका एंटरटेनमेंट पोर्टलने सांगितलेल्या रिपोर्टनुसार, श्रीदेवीला तिच्या मुलींनी सेल्फी काढलेले फोटो सोशल मीडीयावर पोस्ट करण्यास मनाई केली आहे. श्रीदेवीने तिच्या मुलींना त्यांच्या कोणत्याही मित्रांसोबत सेल्फी पोस्ट करण्यास मनाई केली आहे.जान्हवीने लग्न करुन संसार थाटण्याचीही इच्छा श्रीदेवीने व्यक्त केली आहे. ती म्हणते की, मला नाही वाटत की जान्हवीने चित्रपट क्षेत्रात यावे, तिने सरळ लग्न करुन संसार थाटावा असे वाटते. पण आजकलचे मुले आपापल्या मर्जीनेच राहतात त्यामुळे आम्ही आई-वडीलांचे कर्तव्य समजून त्यांना सपोर्ट करतो.Also Read : ​आलिया नाही; जान्हवी करणार वरूणसोबत रोमान्स!