Join us

​OMG : वयाने १८ वर्ष मोठ्या ‘या’ क्रिकेटरच्या प्रेमात होती धकधक गर्ल माधुरी दीक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 18:24 IST

८० आणि ९० च्या दशकात करोडो लोकांच्या मनावर राज करणारी धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्यापेक्षा वयाने १८ वर्ष मोठ्या ...

८० आणि ९० च्या दशकात करोडो लोकांच्या मनावर राज करणारी धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्यापेक्षा वयाने १८ वर्ष मोठ्या असलेल्या एका क्रिकेटरच्या प्रेमात पूर्ण बुडाली होती. माधुरीचे नाव कधी अनिल कपूरसोबत तर कधी संजय कपूरसोबत जोडले गेले होते. मात्र त्याकाळात असा एक क्रिकेटर होता, जो माधुरीला सेक्सी वाटत होता. माधुरी दीक्षित या क्रिकेटरला खूपच पसंत करत होती. तो क्रिकेटरचे नाव आहे सुनील गावस्कर. इंडिया टुडेच्या एका मॅगजीनमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार माधुरीने सुनील गावस्करला सेक्सी म्हटले होते. त्या वृत्तानुसार, आॅक्टोबर १९९२ मध्ये माधुरीने म्हटले होते की, ‘माझी सुनील गावस्करसोबत पळून जाण्याची ईच्छा आहे, ते खरच खूप सेक्सी आहेत.’माधुरीने जेव्हा असे म्हटले होते तेव्हा ती २५ वर्षाची होती आणि सुनील गावस्कर ४३ वर्षाचे होते.