Join us
Daily Top 2Weekly Top 5

​OMG ! कॅटरिना कैफ नोव्हेंबरमध्ये करणार या ‘खान’शी लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 16:26 IST

बॉलिवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ती पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत लग्न करणार आहे. ...

बॉलिवूडची अभिनेत्री कॅटरिना कैफ यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. ती पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्यासोबत लग्न करणार आहे. आपल्यालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?...पण घाबरू नका, हे काय खरेखुरे लग्न नव्हे. तर चित्रपटात ती फवादसोबत लग्न करणार आहे. हे दोघेही करण जोहरच्या चित्रपटाच पहिल्यांदा मुख्य भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहर आणि फॉक्स स्टार स्टुडिओजच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करतायत. ही कहाणी आधारित आहे उत्तर प्रदेशातील एका लग्नावर. यात कतरिना आणि फवाद यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आलीये