Join us
Daily Top 2Weekly Top 5

​OMG !! करिश्मा कपूरच्या ‘बॉयफ्रेन्ड’ने पत्नीला ठरवले मानसिक रूग्ण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 13:52 IST

करिश्मा कपूरचा कथित बॉयफ्रेन्ड संदीप तोष्णीवाल यांचे नाते आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. करिश्मा याबद्दल काही बोललेली नसली तरी ...

करिश्मा कपूरचा कथित बॉयफ्रेन्ड संदीप तोष्णीवाल यांचे नाते आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. करिश्मा याबद्दल काही बोललेली नसली तरी हे नाते बरेच पुढे गेल्याची खबर आहे. गेल्या काही महिन्यात करिश्मा व संदीप दोघेही अनेक प्रसंगी एकत्र दिसले. मध्यंतरी करिश्मा संदीपसोबत एकाच घरात राहणार, अशीही खबर आली. आता या बातमीत किती सत्यता आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण आमच्याकडे एक नवी बातमी मात्र नक्कीच आहे. होय, मीडिया रिपोर्ट्सचे मानाल तर, संदीप लवकरच त्याची डॉक्टर पत्नी अश्रिता हिला घटस्फोट देऊ शकतो. विशेष म्हणजे, संदीपने घटस्फोटासाठी आपली पत्नी मानसिक रूग्ण असल्याचे कारण दिले आहे. माझी पत्नी मानसिक रूग्ण आहे. यामुळे आमच्या नाते पुढे जाणे शक्य नाही, अशी सबब पुढे करून संदीपने घटस्फोट मागितला आहे.संदीपला दोन मुली आहेत. एक मुलगी ११ वर्षांची आहे तर दुसरी सहा वर्षांची आहे. रिपोर्ट्सनुसार, पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर करिश्मासोबत नवा संसार थाटण्याचा संदीपचा निर्णय पक्का आहे. करिश्मासाठी एक अलिशान घरही तो शोधतो आहे.अलीकडे करिश्मानेही तिचा एक्स हबी संजय कपूर याच्यापासून कायदेशीर घटस्फोट घेतला. संजयपासून विभक्त झाल्यानंतर करिश्माचे नाव लगेच संदीप तोष्णीवालसोबत जोडले गेले.सर्वप्रथम करिना कपूरचा ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाच्या पार्टीदरम्यान करिश्मा व संदीप सर्वप्रथम एकत्र दिसले होते. यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा बरीच रंगली होती. काही दिवसांपूर्वी करिश्मा तिची  प्रेग्नंट बहीण करिना कपूर हिच्या घरी तिला भेटायला गेली होती. यावेळी संदीपही तिच्यासोबत होता. तूर्तास करिश्मा आपल्या पित्याच्या घरी राहतेय.   तिची दोन मुले समैरा व कियान हेही तिच्यासोबत राहत आहेत. ALSO READ : करिश्मा कपूर, बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत राहणार एकाच घरात!अखेर घटस्फोट झाला