‘द इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’च्या या स्टेजवरचा कंगना व करणचा एक फोटो सध्या वेगाने व्हायरल होतो आहे. या स्टेजवर कंगना व करण दोघांनीही प्रचंड मस्ती केली. इतकेच नाही तर याही वेळी कंगनाने करणची चांगलीच मजा घेतली. करण आपल्या शोमध्ये पाहुण्यांना काय पाजतो, असा प्रश्न कंगनाला ‘द इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’च्या स्टेजवर विचारला गेला. त्यावर कंगनाने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. होय, ‘करण मेहमानों को जहर पिलाता है, मुझसे पुछो,’ असे कंगना या म्हणाली. अर्थात कंगना हे गमतीगमतीत बोलली.
यापूर्वी कंगनाला तुझ्या शोवर बोलवणार का, असा प्रश्न करणला विचारला गेला होतो तेव्हा, त्याने होकारार्थी उत्तर दिले होते. तिने आमच्या शोवर यावे, असे आम्हाला वाटते. आमचे दरवाजे तिच्यासाठी नेहमी खुले आहेत, असे करण म्हणाला होता. करणच्या या विधानावर कंगनानेही प्रतिक्रिया दिली होती. मी केवळ ‘इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार’ शोमध्ये जाण्याचा विचार करतेय. ही एक प्रोफेशनल गोष्ट आहे. कारण याचे मला पैसे मिळतात. करणने माझे स्वागत केलेय, हे पाहून मला आनंद झालाय. पण मी जिथे कुठे जाते, त्यासाठी लागणारी पुण्याई मी कमावलीय. मी स्वत:ला सिद्ध केलेय. कुणालाही माझ्यासाठी दरवाजे उघडण्याची गरज नाही. मी स्वत: माझ्यासाठी दरवाजे उघडू शकते, असे कंगना म्हणाली होती.
ALSO READ : कंगना राणौत झाली ‘कंगाल’! ‘महाग’ पडले हृतिक रोशनसोबतचे वैर!!
गतवर्षी करणच्याच ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये जावून कंगनाने त्याला ‘मुव्ही माफिया’म्हटले होते. कंगनाचा हा घाव करणच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता.