Join us

OMG ! कंगना राणौत वाढवणार १० किलो वजन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 18:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही जोखीम पत्करायला घाबरत नाही. मग ती रिअल लाईफ असो की रिल लाईफ.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही जोखीम पत्करायला घाबरत नाही. मग ती रिअल लाईफ असो की रिल लाईफ. भूमिका कितीही आव्हानात्मक असो, कंगना ती स्वीकारते आणि केवळ स्वीकारतचं नाही तर त्या भूमिकेला पूरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करते. लवकरच कंगना ‘पंगा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात कंगना महिला कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिकाही कंगनासाठी आव्हानात्मक आहे़. कारण या भूमिकेसाठी तिला थोडे थोडके नव्हे तर तब्बल १० किलो वजन वाढवावे लागणार आहे. बरेली की बर्फी, नील बट्टे सन्नाटा फेम दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करतेय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील सुट्टीवरून परतताच कंगना ‘पंगा’साठी तयारी सुरू करेल़ कबड्डी हा खेळ कंगनाला माहित आहे. पण प्रोफेशनल खेळाडू दिसण्यासाठी तिला काही प्रशिक्षणाची गरज आहे. लवकरच कंगना यासाठीच्या प्रशिक्षणास सुरुवात करेल. याच काळात ती आपले १० किलो वजनही वाढवेल. सध्या कंगना हाय कॅलॅरी प्रोटीन डाएटवर आहे . कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत  . अलीकडे अश्विनीने या चित्रपटाच्या स्टारकास्टची माहिती देणारा व्हिडिओ जारी केला होता. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 

तूर्तास कंगना ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात कंगना राणी लक्ष्मीबार्इंची भूमिका वठवताना दिसणार आहे. जानेवारी २०१९ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टॅग्स :कंगना राणौत