OMG! it is all fake!! तो फोटो आदिराचा नाहीच..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 17:27 IST
राणी मुखर्जीने आपल्या तान्हुलीचा म्हणजेच आदिराचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. राणीने शेअर केलेला ...
OMG! it is all fake!! तो फोटो आदिराचा नाहीच..
राणी मुखर्जीने आपल्या तान्हुलीचा म्हणजेच आदिराचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. राणीने शेअर केलेला आदिराचा फोटोही आम्ही तुम्हाला दाखवला होता. पण आदिराचा हा फोटो फेक असल्याचे किंबहुना राणीने ज्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला होता, ते अकाऊंटही फेक असल्याचे समोर आले आहे. खुद्द राणीच्या प्रवक्त्याने याबाबत खुलासा केला आहे. @iamranimuker या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले गेले होते. हे राणीचे अधिकृत अकाऊंट असल्याचा दावा करण्यात आला होता. यावर आदिराचा, तिच्या रूमचाही फोटोही शेअर करण्यात आला होता. मात्र हे सर्व फोटो फेक असल्याचे राणीच्या प्रवक्त्याने जाहिर केले आहे. राणी मुखर्जीचे कुठलेही सोशल अकाऊंट नाही आणि असणारही नाही. अनेक फेक अकाऊंट असतात, त्याचप्रमाणे हेही एक फेक अकाऊंट आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये. यावर शेअर केले गेलेले सर्व फोटो, मॅसेजेस फेक आहेत,असे या प्रवक्त्याने स्पष्ट केले. राणीने ९ डिसेंबर २०१५ रोजी आदिराला जन्म दिला होता. ..................................................................................पाहा : रानी-आदित्यची आदिराराणी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘बेफ्रिके’च्या संपूर्ण टीमसोबतचा आपला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तिने आपल्या तान्हुलीचा म्हणजेच आदिराचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.राणीने पहिल्यांदा आदिराचा कुठला फोटो शेअर केला आहे. राणीने ९ डिसेंबर २०१५ रोजी आदिराला जन्म दिला होता. मात्र यानंतर राणी लाइमलाईटपासून दूर होती. आता आदिरा जवळजवळ सात महिन्यांची आहे. आता या फोटोनंतर आदिराचे अनेक फोटो आपल्याला असेच पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करू या!!