Join us

OMG : रणबीर कपूरच्या आयुष्यात आली 'ही' नवी मुलगी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 11:58 IST

रणबीर कपूर जेव्हा पासून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे त्यावेळेपासून कोणत्या ना कोणत्या मुलीमुळे तो चर्चेत राहिला आहे. रणबीरच्या करिअरची ...

रणबीर कपूर जेव्हा पासून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे त्यावेळेपासून कोणत्या ना कोणत्या मुलीमुळे तो चर्चेत राहिला आहे. रणबीरच्या करिअरची सुरुवात सोनम कपूरच्या अपोझिट सावरियाँ चित्रपटातून झाली होती. यावेळी त्याचे नाव सोनम कपूरच्यासोबत जोडले गेले त्यानंतर हा सिलसिला पुढे कायम राहिला. त्यानंतर दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ यांच्यासोबत सुद्धा रणबीरच्या अफेयरची चर्चा होती. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीरच्या आयुष्यात कॅटरिना कैफ आली. दोघे लिव्हनमध्ये राहत असल्याचीदेखील चर्चा होती मात्र हे ही नातं फारकाळ टिकले नाही. कॅटरिनाशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूर मानसिकदृष्ट्या खचला होता. यातून सावरायला त्याला वेळ लागणार असल्याची चर्चा होती. मात्र ताज्या माहितीनुसार रणबीर कपूर एका परदेशी मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे.     डीएनएमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार रणबीर कपूर लवकरच आपल्य़ा नव्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जॉर्जियाला रवाना होणार आहे. माहितीनुसार रणबीरची नवी गर्लफ्रेंड भारतात नाही येऊ शकत म्हणून रणबीरने तिला भेटण्यासाठी जॉर्जियासारख्या जागेची निवड केली आहे. आता या मागे नेमके काय कारण असेल की रणबीर आपल्या नव्या गर्लफ्रेंडला भारतात घेऊन येऊ शकत नाही. तर कदाचित असे असू शकत की रणबीरचे नावं या आधी अनेक मुलींशी जोडले गेले आहे. यावेळी रणबीरला आपल्या पर्सनल लाईफला घेऊन मीडियात कोणतीच चर्चा नको असेल म्हणून रणबीर तिला भेटण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला असेल. ALSO READ : SEE PIC : सततच्या अपयशाला कंटाळून रणबीर कपूरने मानला ज्योतिषाचा सल्ला! वाचा सविस्तर!!नुकतीच रणबीरने राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग संपवली आहे. रणबीरला आता फक्त काही सोनम कपूरसोबतचे सीन्स शूट करायचे आहेत. यानंतर शूटिंग संपणार आहे. याचित्रपटासाठी रणबीरने खूप मेहनत घेतली आहे. संजय दत्तचा बायोपिक मार्च 2018मध्ये रिलीज होणार आहे. रणबीरचा जग्गा जासूस चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटलानंतर त्याला सध्या एक हिटची गरज आहे. संजय दत्तच्या बायोपिकनंतर रणबीर आपला मित्र आयन मुखर्जीच्या ड्रैगन चित्रपटाचे काम सुरु करणार आहे. ज्यात त्याच्यासोबत आलिया भट्ट झळकणार आहे.