OMG!! अजयबद्दल हे काय बोलून गेली एरिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 13:06 IST
अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटातून पॉलिश अभिनेत्री एरिका कार बॉलिवूड डेब्यू करतेय. साहजिक बॉलिवूडबद्दल बोलताना सध्या एरिका जराही थकत ...
OMG!! अजयबद्दल हे काय बोलून गेली एरिका?
अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटातून पॉलिश अभिनेत्री एरिका कार बॉलिवूड डेब्यू करतेय. साहजिक बॉलिवूडबद्दल बोलताना सध्या एरिका जराही थकत नाहीय. बॉलिवूड चित्रपट म्हणजे ‘मॅजिक’ आहेत, असे तिचे मत आहे. माझ्या देशातील प्रत्येक चित्रपटात बहुतांश हिंसा दाखवली जाते. पण बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमान्स,अॅक्शन, फिलींग सगळेच असते. यातील संगीत तर मनाला स्पर्शून जाते, असे एरिका म्हणाली. आता एरिका अजय देवगणसोबत काम करतेयं. साहजिकच अजयबद्दलचा प्रश्न तिला विचारला जाणारच. त्यामुळेच अजयसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न एरिकाला विचारण्यात आला. पण या प्रश्नावर एरिका जे बोलली, ते ऐकून प्रश्न विचारणा-याच्याही भूवया उंचावल्या गेल्या.होय, एरिका अजयसोबत बॉलिवूड डेब्य करतेय, पण ती अजयच्या नाही तर शाहरूखच्या अभिनयाने प्रभावित आहे. केवळ एवढेच नाही तर शाहरूख हा ग्लोबल हिरो अर्थात जागतिक हिरो आहे, असे तिचे मत आहे. ती याबद्दल म्हणाली, मी शाहरूखची सर्वात मोठी चाहती आहे. आमच्या पोलंडमध्ये त्याला प्रत्येकजण ओळखतं. त्याचे असंख्य चाहते तिथे आहेत. शाहरूख व काजोलची जोडीही पोलंडमध्ये लोकप्रीय आहे. केवळ शाहरूख आणि काजोल हेच बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवतात, हेच आत्ताआत्तापर्यंत मला ठाऊक होते. अजयचे तर मी नावही ऐकले नव्हते. त्याचा एकही चित्रपट मी पाहिलेला नव्हता. केवळ अजयच नाही तर सलमान खान आणि आमीर खान सुपरस्टार्स आहेत, हेही मला अलीकडेच कळले. मला फक्त शाहरूख आणि काजोल हे दोघेच माहित होते. आता एरिकाचे हे ‘शाहरूख पुराण’ ऐकून अजयची काय प्रतिक्रिया असेल? तुम्ही अंदाज लावू शकता? याबद्दल खुद्द एरिकालाच विचारल्यावर ती हसत सुटली. अजयला मी सांगितले तेव्हा तो नुसताच हसला. तू मला ओळखत नाही, हे मला ठाऊक आहे, असे तो स्वत:च मला म्हणाला. कदाचित मी शाहरूखची चाहती आहे, हे ऐकून त्याला वाईट वाटले नसावे, असे ती म्हणाली. आता एरिकाला कुणी सांगावे, अजय तो हिरो का हिरो है...!!