Join us  

OMG! रणवीर सिंग नाही तर दीपिका पादुकोणने रणबीर कपूरला दिला ‘गुडबाय किस’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 11:30 AM

गतवर्षी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतीय रितीपरंपरेनुसार लग्न केले. सध्या दोघेही आपल्या सहजीवनात अतिशय आनंदी आहेत. पण याचदरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्य म्हणजे, या फोटोत दीपिकासोबत रणवीर सिंग नसून रणबीर कपूर दिसतोय. 

ठळक मुद्दे रणबीर-दीपिका दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. पण दोघांमध्ये आजही मैत्रीचे नाते आहे. नुकतेच रणबीर व दीपिका एका जाहिरातीत झळकले. 

गतवर्षी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतीय रितीपरंपरेनुसार लग्न केले. सध्या दोघेही आपल्या सहजीवनात अतिशय आनंदी आहेत. पण याचदरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्य म्हणजे, या फोटोत दीपिकासोबत रणवीर सिंग नसून रणबीर कपूर दिसतोय. काल रात्री दीपिका व रणबीर यांनी एका अवार्ड नाईटला हजेरी लावली. दोघांनीही स्टेजवर एकमेकांसोबत धम्माल मस्ती केली. ‘लडकी आंख मारे’ या पती रणवीरच्याच गाण्यावर दीपिका व रणबीरने ताल धरला.

हा इव्हेंट संपल्यानंतर रणबीर व दीपिका बाहेर आलेत. यावेळी दोघेही एकमेकांना किस आणि हग करताना दिसले. साहजिकच त्यांचे हे फोटो क्षणात व्हायरल झालेत. अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या.

काहींना दीपिका व रणबीरचे हे ‘स्वीट जेस्चर’ आवडले तर काहींनी ते पाहून नाक मुरडले. काहींनी रणबीरला दीपिका सोडून आलियावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. पण जगापासून बेफिकीर रणबीर व दीपिकाला यामुळे फार फरक पडला नाही आणि कदाचित पडणार नाही. खरे तर रणवीरलाही यावर आक्षेप नसावा...दीपिका एकेकाळी रणबीरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अगदी तिचे रणवीरसोबत लग्न होण्यापूर्वीपर्यंत दीपिका व रणबीर यांचे कधीही पॅचअप होईल असे अनेकांना वाटत होते. पण असे न होता दीपिकाने रणवीरला आपला जोडीदार म्हणून निवडले. तर रणबीर कॅटरिना कैफला सोडून आलिया भट हिच्यात गुंतला. आता रणबीर-दीपिका दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. पण दोघांमध्ये आजही मैत्रीचे नाते आहे. नुकतेच रणबीर व दीपिका एका जाहिरातीत झळकले. 

टॅग्स :दीपिका पादुकोणरणबीर कपूररणवीर सिंग