Join us

​OMG!! रिलीजच्या एक दिवस आधी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ लीक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:11 IST

‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या संपूर्ण टीमसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, रिलीजच्या एक दिवस आधी हा चित्रपट आॅनलाईन लीक झाल्याची खबर ...

‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या संपूर्ण टीमसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, रिलीजच्या एक दिवस आधी हा चित्रपट आॅनलाईन लीक झाल्याची खबर आहे. अर्थात ‘बाबूमोशाय बंदूकबाज’च्या मेकर्सनी अद्याप याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. पण ही बातमी खरी असेल तर चित्रपटाच्या कमाईला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कधी नव्हे इतक्या बोल्ड आणि इंटिमेट सीन्समुळे चर्चेत आलेला ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ खरे तर सुरूवातीपासूनच वादात सापडला आहे. अगदी याच्या  पोस्टर रिलीजपासून एक ना अनेक समस्यांचा सामना चित्रपटाला करावा लागलाय. प्रारंभी या चित्रपटासाठी चित्रांगदा सिंह हिला घेण्यात आले. मात्र दिग्दर्शक अवास्तव बोल्ड सीन्सची मागणी करत असल्याचा आरोप करत, चित्रांगदाने हा चित्रपट सोडला. चित्रांगदाने ऐनवेळी रामराम ठोकल्याने मेकर्सची हिरोईनची शोधाशोध करताना बरीच धावपळ झाली. अखेर चित्रपटाला बिदीता बाग ही बंगाली हिरोईन मिळाली. कोलकात्यात चित्रपटाचे शूटींगही सुरु झाले पण  मेकर्स पुन्हा अडचणीत आलेत. शूटींगदरम्यान रोज नवे नियम, समस्या बघता अगदी नाईलाज म्हणून ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे शूटींग कोलकात्यावरून हलवून बिहारमध्ये करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यानंतर सेन्सॉर बोर्डाचा एक अध्याय गाजला. सेन्सॉर बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी या चित्रपटात तब्बल ४८ कट्स सुचवले. अखेर मेकर्सला फिल्म सर्टिफिकेट अपिलेट ट्रिब्युनलकडे दाद मागावी लागली. ट्रिब्युनलने अठ कट देत चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकांना दिलासा दिला असतानाच आता ही नवी समस्या चित्रपटासमोर  निर्माण झाली आहे.आता यातून  ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे मेकर्स कसा तोडगा काढतात, ते बघुयात!