OMG!! ‘चड्ढी एक्सचेंज करते है खान ब्रदर्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:09 IST
Sharing Underwear With His Brothers, Salman Is Brewing A Lot On 'Koffee With Karan' In This Teaser : Koffee With Karan : Salman KHAN: ‘कॉफी विद करण’ म्हणजे सेलिब्रिटींच्या लाईफची अनेक सीक्रेट हमखास ऐकायला मिळणार. लवकरच करणच्या या शोमध्ये खान ब्रदर्स एकत्र आलेले पाहायला मिळणार आहे. नुकतेच या एपिसोडचे शूट झाले. यावेळी सलमान खान,अरबाज खान आणि सोहेल खान या तिघा भावांनी धम्माल मस्ती केली.
OMG!! ‘चड्ढी एक्सचेंज करते है खान ब्रदर्स’
‘कॉफी विद करण’ म्हणजे सेलिब्रिटींच्या लाईफची अनेक सीक्रेट हमखास ऐकायला मिळणार. लवकरच करणच्या या शोमध्ये खान ब्रदर्स एकत्र आलेले पाहायला मिळणार आहे. नुकतेच या एपिसोडचे शूट झाले. यावेळी सलमान खान,अरबाज खान आणि सोहेल खान या तिघा भावांनी धम्माल मस्ती केली. केवळ मस्तीच नाही तर खासगी आयुष्यातील अनेक गुपितही त्यांनी शेअर केलीत. येत्या रविवारी हा एपिसोड लाइव्ह होणार. तत्पूर्वी याचे एक टीजर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या एपिसोडमध्ये सलमान व ब्रदर्सने एक मोठ्ठा खुलासा केला. तो म्हणजे ‘चड्ढी एक्सचेंज’. होय, खान ब्रदर्स ‘चड्ढी एक्सचेंज’ करतात, हाच तो खुलासा. करणने सलमान, अरबाज व सोहेल या तिघांना लहानपणीच्या काही आठवणी विचारल्या. यावेळी खान ब्रदर्सने हा खुलासा केला. लहानपणी आम्ही एकमेकांच्या ‘चड्ढी’ शेअर करायचो, असे त्यांनी सांगितले. यावर आजही असे करता का? असा प्रश्न करणने केला. या प्रश्नावर अरबाज काही बोलत नाही. पण इशाºया इशाºयात ‘हो’ असे उत्तर तो देतो. यानंतर करण सलमानला काही नावांमधून त्याची आवडती अभिनेत्री निवडायला सांगतो. पण नावांचे पर्याय ऐकण्यापूर्वीच पहिल्या चारमध्ये कॅटरिना हीच माझी आवडती आहे, असे सलमान म्हणतो. यानंतर कॅटरिनाच्या ‘शीला की जवानी’वर सलमान डान्सही करतो. याचदरम्यान सोहेलही एक लहानपणीची आठवण सांगतो. लहानपणी आम्ही सगळे लोक अरबाजच्या खोलीला ‘बर्मुडा ट्रँगल’ म्हणायचो. कारण घरी जी पण मुलगी यायची ती अरबाजच्याच खोलीत जायची, असे त्याने सांगितले.