Join us  

OMG...! बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी घातला २० लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 6:17 PM

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी या अभिनेत्रीला खूप स्ट्रगल करावा लागला होता.

आपल्या डान्समुळे नेहमी चर्चेत येणारी बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा ओ साकी साकी गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमुळे चर्चेत आली आहे. हे गाणं जॉन अब्राहमचा आगामी चित्रपट बाटला हाऊसमधील आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नोरा मुळची कॅनडाची असून तिचा कॅनडा ते बॉलिवूड चित्रपटसृष्टी असा प्रवास खूप खडतर असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं.

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत नोरानं तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागल्याचं सांगितलं. ती म्हणाली की, ‘मी सुरुवातीला हिंदी शिकत होते. पण मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. लोक माझ्या बोलण्यावर हसत, तोंडावर माझी खिल्ली उडवायचे. मला फार वाईट वाटायचं. घरी जाताना मला रोज रडायला यायचं. मी आयुष्यात हे कधीच विसरणार नाही.

दरम्यान अनेकांनी मला ‘आम्हाला तुझी गरज नाही तू तूझ्या देशात परत जा’ असंदेखील सुनावलं होतं.

इतकंच नाही तर नोराला भारताचा व्हिसा मिळवण्यासाठी एका एजेन्सीनं २० लाखांचा गंडा घातला होता. तिने याबाबत सांगितलं की, ‘मला माझी पहिली एजेन्सी आठवते जिने मला कॅनडाहून भारतात आणलं. त्यांची वर्तवणूक अतिशय चुकीची आणि मला दिशाभूल करणारी होती. त्यामुळे मी त्यांची मदत न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्या एजेन्सीला मी तसे कळवताच त्यांनी माझे २० लाख रुपये परत न देण्याचा दावा केला.

टॅग्स :नोरा फतेहीव्हिसा