Join us  

OMG! ​ऐश्वर्या राय बच्चन आई असल्याच्या दावा करणा-या ‘त्या’ युवकाबद्दल समोर आली नवी माहिती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2018 6:06 AM

ऐश्वर्या राय बच्चन माझी आई आहे, असा दावा करणा-या आंध्र प्रदेशच्या संगीत कुमारबद्दल नवी माहिती समोर आली आहे. १९८८ ...

ऐश्वर्या राय बच्चन माझी आई आहे, असा दावा करणा-या आंध्र प्रदेशच्या संगीत कुमारबद्दल नवी माहिती समोर आली आहे. १९८८ मध्ये ऐश्वर्याने आपल्याला आयव्हीएफ तंत्राद्वारे जन्म दिला होता, असा दावा करणा-या संगीत कुमारचे एक एक सत्य पुढे येत आहे. सर्व प्रथम त्याचे खरे नाव संगीत कुमार नसून आदिरेड्डी संदीप असे असल्याचे कळतेय. पोलिसांनी संदीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.   ऐश्वर्या रायने या तथाकथित मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यास तो मोठ्या कायदेशीर कारवाईत फसू शकतो. आम्हाला तक्रार मिळालीच तर आम्ही त्वरित कारवाई करू, असे पोलिसांनी म्हटले आहे. स्वत:ला ऐश्वर्याचा मुलगा सांगणाºया याच संदीप कुमारने याआधी तो ए आर रहमान यांचा शिष्य असल्याचा दावा केला होता.  संदीप हा एपी रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनमध्ये नोकरीवर असलेल्या एका बस कंडक्टरचा मुलगा आहे. तो अभ्यासात हुशार आहे. पण त्याला दारूचे व्यसन आहे. आई ऐश्वर्याबद्दल खरीखुरी आणि समाधानकारक माहिती मिळेल, तेव्हाच घरी परतेल, असा हट्ट धरून बसलेला संदीप कुमार सध्या  आपल्या फोनमध्ये ऐश्वर्याचा फोटो घेऊन सर्वत्र फिरतो आहे. किमान ऐश्वर्याचा फोन नंबर मिळावा आणि तिच्याशी प्रत्यक्ष बोलून सगळे काही स्पष्ट करावे, अशी त्याची इच्छा आहे. मी यापूर्वी कधीही आई ऐश्वर्यासोबत बोलण्याचा वा तिला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. याचे कारण माझे कुटुंब आहे. त्यांनी  मला ऐश्वर्या माझी आई असल्याबद्दल कायम अंधारात ठेवले. मला चुकीची माहिती दिली. मी तिच्यापासून २७ वर्षे दूर राहिलो. पण आता मला तिच्यासोबत राहायचे आहे. आई ऐश्वर्याबद्दल खरी माहिती मिळत नाही, तोपर्यत मी आता घरी परतणार नाही, असे संगीत कुमारने म्हटले आहे.   ALSO READ : ​ऐश्वर्या राय बच्चनचा ‘मुलगा’ धरून बसलाय वेगळाच हट्ट! वाचा, संपूर्ण बातमी!!अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय दोघांमध्येही मतभेद विकोपाला गेले आहेत आणि सध्या दोघेही वेगवेगळे राहतात, असाही त्याचा दावा आहे. अर्थात आपले हे दावे सिद्ध करणारे कुठलेही पुरावे त्याच्याकडे नाही.   १९८८ मध्ये माझा जन्म झाला.यानंतर ऐश्वर्याचे आईवडिल वृंदा राय आणि कृष्णराज राय यांनी माझे पालनपोषण केले. यापश्चात आदिवेलू रेड्डी यांनी (युवकाचे वडील) मला विशाखापट्टणमला आणले. तेव्हापासून मी इथेच राहतोय, असे संगीत कुमारचे म्हणणे आहे. तूर्तास ऐश्वर्याने या प्रकरणावर कुठलेही बयान दिलेले नाही.