Join us  

OMG! कियारा आडवाणी, सनी लिओनीनंतर आता जॅकलिन फर्नांडिसनंही केलं टॉपलेस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 3:57 PM

नुकताच जॅकलिनचा टॉपलेस फोटो समोर आला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

चिट्टीयां कलाईयां वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी आगामी प्रोजेक्टमुळे तर बोल्ड अन् ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. नुकताच जॅकलिनचा टॉपलेस फोटो समोर आला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. बॉलिवूड सेलेब्रिटी  फोटोग्राफर डब्बू रत्नानीसाठी  आतापर्यंत अनेक अभिनेत्री टॉपलेस झाल्या. आता डब्बूसाठी जॅकलीन फर्नांडिस टॉपलेस झाली आहे. फोटोतील जॅकलीनचा बोल्ड आणि हॉट अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने त्याच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर जॅकलिन फर्नांडिसचे फोटो शेअर केले आहेत ज्यात ती स्वतःला चादरीत झाकून घेताना दिसते आहे.त्याने फोटो शेअर करत लिहिले की, 'दररोज सकाळी लवकर उठा. कारण जेव्हा इतर स्वप्न पाहत असतील तेव्हा तुम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्ग शोधत असाल.'

जॅकलिननेदेखील तिच्या इंस्टा स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत.जॅकलिनच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. यापूर्वीदेखील जॅकलिनने टॉपलेस अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. 

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, ती लवकरचं 'भूत' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत रामसेतू सिनेमातही दिसणार आहे. तसेच ती रोहित शेट्टी दिग्दर्शित सर्कस सिनेमात रणवीर सिंगसोबतही दिसणार आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसडब्बू रतनानीअक्षय कुमाररोहित शेट्टीरणवीर सिंग